गोल्फ प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 07:23 PM2019-11-13T19:23:34+5:302019-11-13T19:23:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क निफाड : येथील रिव्हर साइड गोल्फ कोर्स येथे गोल्फ आणि कॅडी प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ झाला आहे. राज्यभरातील प्रशिक्षणार्थींनी या शिबिरात सहभाग घेतला आहे.

 Start golf training camp | गोल्फ प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ

गोल्फ प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ

Next
ठळक मुद्देदि. १६ आणि १७ नोव्हेंबरदरम्यान राज्यस्तरीय गोल्फ स्पर्धेचे आयोजन येथे करण्यात आले आहे. यानिमित्त आयोजित या प्रशिक्षण शिबिरात हमजा सय्यद, विंग कमांडर (सेवानिवृत्त) प्रदीप बागमार, नितीन हिंगमिरे हे प्रशिक्षक म्हणून काम बघत आहेत.


लोकमत न्यूज नेटवर्क
निफाड : येथील रिव्हर साइड गोल्फ कोर्स येथे गोल्फ आणि कॅडी प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ झाला आहे. राज्यभरातील प्रशिक्षणार्थींनी या शिबिरात सहभाग घेतला आहे.
दि. १६ आणि १७ नोव्हेंबरदरम्यान राज्यस्तरीय गोल्फ स्पर्धेचे आयोजन येथे करण्यात आले आहे. यानिमित्त आयोजित या प्रशिक्षण शिबिरात हमजा सय्यद, विंग कमांडर (सेवानिवृत्त) प्रदीप बागमार, नितीन हिंगमिरे हे प्रशिक्षक म्हणून काम बघत आहेत.
हे शिबिर व स्पर्धा यशस्वीतेसाठी राजीव देशपांडे, स्नेहल देव, खंडेराव कोतकर आदी परिश्रम घेत आहेत. निफाड येथे प्रथमच होत असलेल्या या स्पर्धेत राज्यभरातील सुमारे ५० खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. भारतीय सैन्य दल आणि वायू दलातील खेळाडूंनी यात सहभाग घेतला आहे.
निफाड-पिंपळगाव रस्त्यावर निफाड रेल्वेस्थानकाजवळ असलेल्या रिव्हर साइड गोल्फ कोर्स येथे खेळाडूंचा सराव सुरू झाला आहे. नाशिक शहरातील सातपूर येथील हॉटेल बीएलव्हीडी येथे सवलतीच्या दरात खेळाडूंना राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वासन टोयोटा, इनोव्हा रबर यांच्या व्यवस्थापनाचे सहकार्य लाभले आहे.

Web Title:  Start golf training camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.