द्राक्षांच्या देखभालीला प्रारंभ
By admin | Published: December 30, 2016 11:08 PM2016-12-30T23:08:02+5:302016-12-30T23:08:33+5:30
दिंडोरी : घडावर उन्हाचा परिणाम होण्याची शक्यता
पांडाणे : द्राक्षपंढरी संबोधल्या जाणाऱ्या दिंडोरी तालुक्यातील पांडाणे परिसरात निर्यातक्षम द्राक्षे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जात असताना त्या पिकाची देखभाल व निर्यात होईपर्यंत काळजी घेतली जाते. द्राक्षपिकावर वातावरणाचा परिणाम होऊन कोणत्याना कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कागद लावून काळजी घेतली जात आहे. दिंडोरी तालुक्यात निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेतले जाते. खरड छाटणीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत निर्यातक्षम द्राक्षाला एकरी दोन लाखांपर्यंत खर्च येत असतो. गोडाबार छाटणीपासून ते १३५ दिवसापर्यंत व ब्रिक्स साखरेचे प्रमाण झाल्यानंतर द्राक्ष निर्यातक्षम समजले जातात. निर्यातक्षम द्राक्षे पाठविण्यासाठी शून्य डिटेक्शन असल्यास त्या द्राक्षाला बाजारभाव चांगला मिळतो. निर्यात करत्यावेळी द्राक्षाचा नमुना लॅबमध्ये पाठवून त्याचे ० ते ५ डिटेक्शनपर्यंत नमुना आल्यास त्याची निर्यात रशिया, इंग्लंड, नेदरलॅण्ड, अमेरिका, यूके , सौदी अरेबिया व इतर राष्ट्रामध्ये द्राक्षाची निर्यात केली जाते. (वार्ताहर)