निमा भवनाच्या जागेवर आरोग्य केंद्र सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 10:35 PM2020-01-10T22:35:39+5:302020-01-11T00:59:22+5:30
रविवार वॉर्डातील एन. एन. वाडिया दवाखाना यांच्यावर असलेले आरोग्य केंद्र येथील इमारतीचा स्लॅब तुटल्या कारणामुळे बंद असून, मनपाने निमा भवनाच्या जागेवर दुरुस्ती करून महिला आरोग्य केंद्र सुरू करावे, अशी मागणी परिसरातील महिलांनी केली आहे.
मालेगाव : रविवार वॉर्डातील एन. एन. वाडिया दवाखाना यांच्यावर असलेले आरोग्य केंद्र येथील इमारतीचा स्लॅब तुटल्या कारणामुळे बंद असून, मनपाने निमा भवनाच्या जागेवर दुरुस्ती करून महिला आरोग्य केंद्र सुरू करावे, अशी मागणी परिसरातील महिलांनी केली आहे.
रविवार वॉर्ड, शनिवार वॉर्ड, सोमवार वॉर्ड हे मंगळवार वॉर्ड या भागातील महिलांना चुनाभट्टी या आरोग्य केंद्रावर उपचार घेण्यासाठी जावे लागते. गरोदर महिलांना उपचार घेण्यासाठी तसेच लहान बालकांना १ ते ५ वर्षातील लसीकरण करण्यासाठी फार लांब पडते. रविवार वॉर्ड एन. एन. वाडिया दवाखान्यावरील आरोग्य केंद्र बंद असल्यामुळे स्थानिक महिलांना व आजूबाजूच्या महिलांना अडचणींना तोंड द्यावे लागते. तसेच रविवार वॉर्ड व शनिवार वॉर्ड हा हिंदू-मुस्लीम संमिश्र लोकसंख्येचा भाग असून, चुनाभट्टी हा संपूर्ण मुस्लीम भाग असून, त्या ठिकाणी हिंदू महिलांना जाण्यास भीती वाटते. त्यामुळे उपचार घेण्यास कंटाळा करतात.
महिला सरकारी सुविधांंपासून वंचित असतात. याला पर्याय मार्ग म्हणून खासगी दवाखान्यात जाऊन आपले उपचार करून घ्यावे लागतात. म्हणून मनपाने निमा भवनाच्या जागेवर दुरुस्ती करून महिला आरोग्य केंद्र सुरू करावे, अशी मागणी परिसरातील महिलांनी केली आहे. आयुक्तांनी येथील प्रभागातील महिला, लहान मुलांच्या आरोग्यासाठी निमा भवनाच्या जागेची दुरुस्ती करून त्या जागेवर रविवार वॉर्ड या जागेवरील असलेले आरोग्य केंद्र त्या ठिकाणी सुरू करण्यात यावे, अशी मागणी भरत पाटील, विनोद कचवे, गणेश गायकवाड, अंजू परदेशी, वर्षा परदेशी, कल्पना खैरनार, पुष्पा पवार, वंदना खैरनार, सिंधूबाई खैरनार, भिकूबाई खैरनार आदींच्या सह्या आहेत.