कालभैरवनाथ यात्रोत्सवास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:11 AM2018-03-26T00:11:27+5:302018-03-26T00:11:27+5:30
श्री कालभैरवनाथ महाराज व जोगेश्वरीमाता यांच्या यात्रोत्सवास (लग्नसोहळा) प्रारंभ झाला आहे. दि. २३ ते ३१ मार्चपावेतो होणाऱ्या या यात्रोत्सवाची सुरुवात श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील गंगाद्वार येथून वडनेरभैरव येथील भाविक-भक्तांनी कावडीने आणलेल्या पवित्र अशा गंगाजलाने अभिषेक करून झाली. मंदिरापुढे रोज टिपºयांचा व परिसरातील वाघे मंडळींचा जागरणाचा कार्यक्रम होते. रोज रात्री सामुदायिक महाआरती होते. गाव व परिसरातील भाविक देवाला पोशाख (वाघा) देऊन नवस फेडतात.
वडनेरभैरव : श्री कालभैरवनाथ महाराज व जोगेश्वरीमाता यांच्या यात्रोत्सवास (लग्नसोहळा) प्रारंभ झाला आहे. दि. २३ ते ३१ मार्चपावेतो होणाऱ्या या यात्रोत्सवाची सुरुवात श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील गंगाद्वार येथून वडनेरभैरव येथील भाविक-भक्तांनी कावडीने आणलेल्या पवित्र अशा गंगाजलाने अभिषेक करून झाली. मंदिरापुढे रोज टिपºयांचा व परिसरातील वाघे मंडळींचा जागरणाचा कार्यक्रम होते. रोज रात्री सामुदायिक महाआरती होते. गाव व परिसरातील भाविक देवाला पोशाख (वाघा) देऊन नवस फेडतात. बुधवार (दि. २८) सायंकाळी ७ वाजता ग्रामपालिका कार्यालयाजवळ परतीच्या रथाचा फरसाचा व रथ खुंटवण्याचा लिलाव होईल. जास्त बोली बोलणाºया भाविकाला त्या ठिकाणी बैलजोडी जुंपण्याचा मान त्या दिवसाकरता मिळेल. लिलाव घेतलेल्या भाविकाचा मानाचा फेटा, बैलांसाठी तोडा, छबीगोंडा व माथुटी देऊन सत्कार करण्यात येतो. मंदिरापासून पालखी सोहळ्यास सुरुवात होईल. पालखी माळी गल्ली, सावता माळी मंदिर, कुंभार गल्ली, सलादे बाबा, दत्त महाराज मंदिर, मेनरोड, ग्रामपालिकामार्गे मारुती मंदिरापाशी येईल. तेथे कालभैरवनाथ महाराज व जोगेश्वरीमाता यांचा साखरपुड्याचा कार्यक्र म होईल. सर्वधर्मसमभाव मानून कालभैरवनाथ महाराजांच्या बाजूने भालेराव पाटील व जोगेश्वरीमाता यांच्या बाजूने मुसलमान पाटील (पटेल) पूजेस बसतील. पूजा झाल्यानंतर गावातील जमलेले भाविक पानसुपारी देवाला अर्पण करतील व त्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ होईल. पालखी भगवा चौक, साबर गल्ली, सावता माळी चौक मार्गे मंदिरापाशी येईल. मंदिरात आरती होऊन पालखी (छबिना) सोहळ्याची सांगता होईल. गुरुवारी (दि. २९) सकाळी ८.३० वाजता ज्यांचा मांडव टाकण्याचा मान आहे ते निकम परिवार डहाळे मांडव टाकतील. त्यानंतर सोनाराच्या येथून देवाचे दागिने मिरवणुकीने मंदिरात आणले जातील. सायंकाळी देवस्थान ट्रस्ट व यात्रा कमिटीच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल. जानवस घरी हळदीचा व दिवट्यांचा कार्यक्र म होईल. रात्रभर मंदिरापुढे मंडळाचा जागरणाचा कार्यक्रम होईल. पहाटे ४ वाजेपर्यंत होमहवनाचा कार्यक्र म सुरू राहील शुक्रवारी (दि. ३०) पहाटे ४ वाजता ज्यांचा मान आहे असे चौधरी, परीट व इतर मानकरी देवाचे तेलवन पाडतील. त्यानंतर महापूजा होईल. महापूजेनंतर ज्यांचा मान आहे असे मानकरी प्रत्यक्ष श्री कालभैरवनाथ महाराज व जोगेश्वरीमाता यांची मूर्ती मंदिरातील गाभाºयातून उचलून रथात ठेवतील. यावेळी वाजतगाजत आलेल्या मुसलमान पाटलाची (पटेल) बैलजोडी रथाला जोडण्यात येईल. रथाचे सारथ्य मानकरी तिडके परिवार करतील. रथाच्या मागे ज्यांचे नवस असतात अशा महिला दंडवत घालतात व पुरु ष लोटांगण घालतात. यात्रेचे नियोजन यात्रा कमिटी व देवस्थान टस्ट अध्यक्ष योगेश साळुंके, उपाध्यक्ष विलास पाचोरकर, संतोष सलादे, सरचिटणीस दत्ता शिंदे, चिटणीस लखन जाधव, अभिजित पाचोरकर, खजिनदार मुकेश वाघ, देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष बाळासाहेब तिडके, चिटणीस तुकाराम वक्टे, सदस्य अनिल पवार, रामदास पाचोरकर, राजाराम भालेराव, सरपंच रावसाहेब भालेराव, यात्रा कमिटी सदस्य राजेंद्र निखाडे, सुरेश वक्टे, राजेंद्र भोसले, राजेंद्र किरकाडे, हरिभाऊ पाचोरकर, गणेश परदेशी, अमित माळी, तुकाराम गांगुर्डे व इतर सदस्य करीत आहेत.
कालभैरवनाथ, जोगेश्वरीमातेचे पूजन
रथ माळी गल्ली, सावता माळी चौक, कुंभार गल्ली, सलादे बाबा, दत्त मंदिर, मेनरोड, ग्रामपालिका चौक, मारुती मंदिर, शनी चौक, बाजारपेठ, पवार गल्ली कोपरा, कोळीवाडामार्गे नेत्रावती नदीवर येईल. तेथे चढ्याबाबाचा चढ चढून जाण्याचा लिलाव होईल. लिलावात बाहेरगावाहून आलेले पाहुणे बोली लावतील. लिलावात जास्त बोली लावणाºया पाहुण्यांचे बैल जोडले जातील. पुढे रथ जानुस घरी आल्यावर रथातून कालभैरवनाथ महाराज व जोगेश्वरीमाता यांच्या मूर्ती उचलून मानकरी मंदिरात ठेवतील. तेथे देवाचे मंगलाष्टके होऊन विवाह होईल. बाजूलाच देवस्थान ट्रस्टच्या जागेमध्ये कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले आहे.