आदिवासी भागात खांडणीस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 01:19 PM2019-01-09T13:19:39+5:302019-01-09T13:20:11+5:30
पेठ -आदिवासी भागातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची पेरणीपुर्व मशागतीला जानेवारी महिन्यापासूनच सुरु वात होत असून त्याचा पहिला टप्पा हा खांडणीपासून सुरू होत असतो.
पेठ -आदिवासी भागातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची पेरणीपुर्व मशागतीला जानेवारी महिन्यापासूनच सुरु वात होत असून त्याचा पहिला टप्पा हा खांडणीपासून सुरू होत असतो. पर्यावरणाला कोणत्याही प्रकारचा धोका पोहचू न देता मुळ वृक्षाला बाधा होणार नाही याची दक्षता घेऊन आदिवासी शेतकरी खांडणी करत असतात. पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर या तालुक्यात भात व नागलीची पिके मोठया प्रमाणावर घेतली जातात. या पिकांची पेरणी व लावणी अशा दोन टप्प्यात केली जाते. पावसाळ्यापुर्वी भात व नागलीच्या बियाणाची शेतकरी पेरणी करतात. यासाठी शेताच्या एका कोपºयात प्रारंभी जमिनीची भाजणी केली जाते. यासाठी झाडांचा पालापाचोळा, गोवर्या, गवत, शेणखत याचा वापर केला जातो. यासाठी शेतकरी रानातील सादडयाच्या ऊंच झाडांच्या बारीक फांद्या खांडून घेतल्या जातात त्यालाच खांडणी असे म्हणतात. मुळ खोडाला कोणत्याही प्रकारची ईजा न होऊ देता बारीक फांद्या डहाळून पालापाचोळा जमा करून ठेवल्या जातात. झाडांचे मुळ खोड शाबूत राहत असल्याने पावसाळ्यात याच झाडाला नवी पालवी फुटते. त्यासाठी सद्या आदिवासी भागात सर्वत्र शेतकरी खांडणीच्या कामात गर्क झाल्याचे दिसून येतात. कमरेला कुºहाड किंवा कोयता बांधून तीव्र उताराच्या कड्यावर वाढलेल्या उंच झाडांवर शेतकरी शिताफीने चढून खांडणी करतात. यासाठी बर्याच वेळा शेतकर्यांना जीव धोक्यात घालावा लागत असतो.