चांदवड बाजार समितीत भुसार शेतमालाच्या लिलावास प्रारंभ
By admin | Published: November 4, 2015 11:47 PM2015-11-04T23:47:31+5:302015-11-04T23:48:17+5:30
चांदवड बाजार समितीत भुसार शेतमालाच्या लिलावास प्रारंभ
चांदवड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारावर मका, सोयाबीन व इतर भुसार शेतमालाच्या नियमित लिलावाचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंंभार्डे, उपसभापती नितीन अहेर यांच्या उपस्थितीत समितीचे संचालक राजेश वानखेडे व विलासराव ढोमसे यांच्या हस्ते शुभारंभाचा नारळ वाढविण्यात आला.
यावेळी समितीचे संचालक विक्रम मार्कंड, संजय जाधव, अण्णासाहेब अहेर, चंद्रकांत व्यवहारे, निवृत्ती घुले, संपतराव वक्टे, पंढरीनाथ खताळ, सुरेश जाधव आदि उपस्थित होते. दरम्यान, पहिल्याच दिवशी मका, बाजरी, कुळीद व सोयाबीन या शेतमालाची एकूण ७०० क्विंटलची आवक झाली. मका बाजारभाव १२३२ ते १४७७ पर्यंत राहिले.
भुसार शेतमालाचे लिलाव सुरू झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांची जवळच भुसार शेतमाल विक्रीची सोय झाली आहे. समितीच्या आवारावर मंंगळवार ते शनिवार या दिवशी नियमित भुसार मालाचे लिलाव सुरू राहतील. तसेच शेतमाल विक्रीची रक्कम रोख स्वरूपात अदा केली जाईल. शेतकऱ्यांनी भुसार
शेतमाल स्वच्छ करून वाळवून विक्रीसाठी आणावा, असे आवाहन समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, उपसभापती नितीन
अहेर, सचिव आर. बी. वाघ यांनी केले.
यावेळी भुसार व्यापारी गणेश वाघ, राजेंद्र अजमेरे, अंकुर कासलीवाल, संतोष जाधव, अविनाश व्यवहारे, नीलेश सोनवणे, कैलास सोनवणे, आदित्य फलके, संदीप राऊत आदि भुसार व कांदा व्यापारी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच भुसार शेतमालाचे नियोजन सहसचिव एस. व्ही. ठाकरे यांनी केले. (वार्ताहर) चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत भुसार मालाचा शुभारंभ करताना सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, उपसभापती नितीन अहेर, संचालक राजेश वानखेडे, संजय जाधव, सुरेश जाधव, गणेश वाघ, आर. बी. वाघ, चंद्रकांत व्यवहारे, निवृत्ती व्यवहारे, राजेंद्र अजमेरे, अंकुर कासलीवाल, एस. व्ही. ठाकरे व शेतकरी.