पांढुर्ली उपबाजारात भुसार शेतमाल लिलावास प्रारंभ

By admin | Published: January 5, 2017 01:26 AM2017-01-05T01:26:38+5:302017-01-05T01:26:52+5:30

पांढुर्ली उपबाजारात भुसार शेतमाल लिलावास प्रारंभ

Start of Livelihood Commodities in Flatshare | पांढुर्ली उपबाजारात भुसार शेतमाल लिलावास प्रारंभ

पांढुर्ली उपबाजारात भुसार शेतमाल लिलावास प्रारंभ

Next

 सिन्नर : येथील सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पांढुर्ली उपबाजार आवारात सोमवारी सकाळी सभापती अरुण वाघ यांच्या हस्ते भुसार शेतमाल लिलावास प्रारंभ करण्यात आला.
यावेळी सोयाबीन, तांदूळ व गव्हाची मोठ्या प्रमाणात आवक झाली होती. शेतकऱ्यांनी माल विक्रीसाठी आणताना बॅँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स प्रत सोबत आणण्याचे आवाहन सभापती वाघ यांनी केले.
याप्रसंगी बाजार समितीचे संचालक विनायक तांबे, लक्ष्मण शेळके, संजय खैरनार, पंढरीनाथ खैरनार, मल्लू पाबळे, सुनील केकाण, सोपान उगले, माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, बाळासाहेब बरकले, बाळासाहेब भोर, अर्जुन हगवणे, बबन हारक, राजाराम भुजबळ, वाल्मीक गवळी, गंगाराम गिते, बाळू नवले, अरुण हारक, पोपट तुपे, अंबादास भुजबळ, विनोद भालेराव, श्याम दळवी, उपसचिव आर. एन. जाधव, आर. जे. डगळे, एस. के. चव्हाणके, ए. बी. भांगरे, वाय. एन. गोळेसर आदिंसह शेतकरी उपस्थित
होते. (वार्ताहर)

Web Title: Start of Livelihood Commodities in Flatshare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.