मालेगावी वॉर्डनिहाय लसीकरण केंद्रे सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:14 AM2021-04-07T04:14:29+5:302021-04-07T04:14:29+5:30
आरोग्यमंत्री टोपे यांनी ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा जाणवणार नाही, यासाठी २० केएल ऑक्सिजन देण्यात येईल. सामान्य रूग्णालयातील २०० खाटांपैकी १०० ...
आरोग्यमंत्री टोपे यांनी ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा जाणवणार नाही, यासाठी २० केएल ऑक्सिजन देण्यात येईल. सामान्य रूग्णालयातील २०० खाटांपैकी १०० खाटा कोविड रूग्णांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यावेळी त्यांनी रूग्णालयात दाखल असलेल्या रूग्णांशी संवाद साधला. कोरोनाला रोखण्यासाठी मालेगावी मतदान केंद्रांप्रमाणे वॉर्डात लसीकरण केंद्रे सुरू केले जातील, यासाठी आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, स्वच्छता निरीक्षक, प्रभाग अधिकारी आदिंचे पथक नियुक्त करण्यात येईल. ४५ वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांना तातडीने लसीकरण करण्याचे नियोजन केले जाईल. तसेच १० खाटांच्या खासगी रूग्णालयांनाही लसीकरण केंद्र सुरू करण्याची परवानगी दिली जाईल. यापुढे लसीकरणावर भर दिला जाणार आहे. मालेगाववासियांना ऑक्सिजन सिलिंडर पुरवठा, रेमडीसिव्हर व इतर आरोग्य सुविधा कमी पडू देणार नाही. मालेगावकडे माझे वैयक्तीक लक्ष असल्याचे टोपे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर डांगे, सहाय्यक आरोग्य शल्यचिकित्सक डाॅ. हितेश महाले व वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून शहर व तालुक्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला.
दरम्यान, मालेगावमध्यचे आमदार माैलाना मुफ्ती मो. इस्माईल म्हणाले की, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण करणे गरजेचे आहे. महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली. महापालिकेचे अधिकारी खोटे बोलत असल्याचा आरोप करीत हज हाऊस, दिलावर हॉल, मन्सुरा कोविड सेंटर बंद असूनही महापालिकेकडून सुरू असल्याचा दावा केला जात आहे. सहारा रूग्णालयातील डॉक्टरांना वेतन अदा केले गेले नाही. महापालिका शहरातील करदाते नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्यास असमर्थ ठरत आहेत. केवळ कागदोपत्री बिले काढली जात आहेत. महापालिकेने पुरेसा औषध साठा व कोरोना बाधित रूग्णांसाठी खाटा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना आमदार मुफ्ती मौलाना इस्माईल यांनी केल्या आहेत.
===Photopath===
060421\06nsk_1_06042021_13.jpg
===Caption===
मालेगाव येथे सामान्य रूग्णालयात दाखल असलेल्या रूग्णांशी संवाद साधताना आरोग्यमंत्री राजेश टोपे. समवेत डॉ. किशोर डांगे आदि.