सप्तश्रृंगीमातेच्या नवरात्रोत्सवास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 12:45 PM2018-10-10T12:45:58+5:302018-10-10T12:46:18+5:30
वणी : श्री सप्तश्रृंगी मातेचा शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला असून आदिमायेच्या चरणी हजारो भाविक नतमस्तक होत आहेत.
वणी : श्री सप्तश्रृंगी मातेचा शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला असून आदिमायेच्या चरणी हजारो भाविक नतमस्तक होत आहेत. सकाळी महापुजा जिल्हा सत्र न्यायाधिश सुर्यकांत शिंदे यांच्या हस्ते करण्या आली. यावेळी सप्तश्रृंगी देवी ट्रस्टचे सर्व विश्वस्त उपस्थित होते. सप्तशिखरातील पर्वतरांगांमधे ४८०० फुट उंचीवर सप्तशृंगगड पर्वत आहे. एका बाजुस खोल असलेली दरी तर दुसऱ्या बाजुस नैसर्गिक वनसंपतीने नटलेला भाग अशा दोन्हीमधे सप्तशृंगी माता विराजमान आहे. साडेतीन शक्तिपीठे महाराष्ट्रात आहेत. सप्तशृंगी देवीला अर्धपीठ म्हणुन संबोधले जाते. तसेच ब्रम्हस्वरूपिणी नावानेही देवीची ओळख आहे. मान्यतेनुसार ब्रम्ह देवतेच्या कमंडलुतुन निघालेली गिरजिा महानदी देवी सप्तशृंगीचे स्वरूप आहे. महाकाली महालक्ष्मी महासरस्वती अशा त्रिगुणात्मक स्वरूपात भगवतीची आराधना करण्यात येते. देवीची मुर्ती शेंदुर व रक्तवर्णीय रंगाची आहे. तेजस्वी डोळे आहेत. ४७२ पायºया चढुन मुख्य मंदिरात जावे लागते. चैत्र व नवरात्र अशा दोन्ही कालावधीत यात्रोत्सव साजरा करण्यात येतो. चैत्रात देवीचे मुखकमल हसरे तर नवरात्रात गंभीर मुद्रा असते. पर्वतावर १०८ पाण्याचे कुंड आहे.