पोषण आहार अभियानास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 01:27 AM2018-09-04T01:27:46+5:302018-09-04T01:29:30+5:30
कुपोषण निर्मूलनाप्रमाणेच पोषण आहार अभियानातदेखील प्रभावी उपाययोजना होणे अपेक्षित असून, जिल्ह्यातील अभियानात सर्वसमावेशक कामगिरी करणे अपेक्षित असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण विभागाचे सभापती यतींद्र पगार यांनी केले.
नाशिक : कुपोषण निर्मूलनाप्रमाणेच पोषण आहार अभियानातदेखील प्रभावी उपाययोजना होणे अपेक्षित असून, जिल्ह्यातील अभियानात सर्वसमावेशक कामगिरी करणे अपेक्षित असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण विभागाचे सभापती यतींद्र पगार यांनी केले. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार देशात १ ते ३० सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय पोषण अभियान राबविण्यात येत आहे. या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने आरोग्य व शिक्षण विभागाचे सभापती यतींद्र पगार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे व केंद्र शासनाचे प्रतिनिधी सुरेंद्र सिंग यांच्या उपस्थितीत थोरात सभागृहात आयोजित एकदिवसीय कार्यशाळेप्रसंगी पगार बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कार्यशाळेत सहभागी झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी कुपोषणासारख्या दुर्लक्षित विषयावर अधिक लक्ष देऊन अतिशय प्रभावीपणे कार्य केले. जिल्हा परिषदेच्या सभागृहानेही त्यांना या कामात पाठिंबा दिला. कुपोषण निर्मूलनाप्रमाणेच १ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या पोषण आहार अभियानात जिल्ह्णाने चांगले काम करून पोषण आहाराचे महत्त्व पटवून द्यावे, असे आवाहन केले. यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनी सर्व विभागांच्या सहकार्याने जिल्ह्णात सर्व क्षेत्रात जलद गतीने काम सुरू असून राज्य पातळीवर जिल्ह्णाचा सन्मान होत आहे. त्यामुळे आपली जबाबदारी वाढली असून पोषण अभियानातही सर्व विभागांनी एकत्रित काम करण्याचे निर्देश दिले. प्रास्ताविक महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे यांनी केले. यावेळी त्यांनी पोषण आहार अभियानाबाबत माहिती दिली. पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे यांनी स्वच्छ अंगणवाडीबाबत माहिती देताना अंगणवाडीत शौचालय सुविधा, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा, वैयक्तिक स्वच्छता याबाबत माहिती दिली. केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाचे प्रतिनिधी सुरेंद्र सिंग यांनी स्तनपानाबाबत माहिती दिली तर अन्न व औषध विभागाचे अधिकारी देवरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अंगणवाडी सेविकांच्या वतीने जिल्हा परिषद आवारात विविध आहारांबाबत प्रदर्शन भरविण्यात आले होते. या कार्यशाळेस बालविकास प्रकल्प अधिकारी, मुख्यसेविका, पर्यवेक्षिका तसेच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सर्व गटविकास अधिकारी, गटशिक्षण अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. कार्यशाळेचे सूत्रसंचालन बाल विकास प्रकल्प अधिकारी सचिन शिंदे यांनी केले.
जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा
च्कार्यशाळेत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन करताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांनी स्वच्छ सर्वेक्षण, कुपोषण निर्मूलन, पंतप्रधान आवास योजना यामध्ये केलेल्या कामाप्रमाणे पोषण आहार अभियानातही काम करून नाशिक जिल्ह्याचा नावलौकिक वाढविण्याचे आवाहन केले.