जिल्ह्यातील कांदा लिलाव सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 12:04 AM2017-09-19T00:04:20+5:302017-09-19T00:04:29+5:30

आवक कमी : लासलगावसह तीन ठिकाणी बंदच नाशिक : गेल्या तीन दिवसांपासून बंद असलेले जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील कांदा लिलाव काही अपवादवगळता सोमवारपासून पूर्ववत सुरू झाले. जिल्ह्यातील लासलगाव,सटाणा आणि नामपूर बाजार समित्यांमध्ये लिलाव झालेले नाहीत. ते दोन दिवसात सुरू होतील, असे सांगण्यात आले.

Start the onion auction in the district | जिल्ह्यातील कांदा लिलाव सुरू

जिल्ह्यातील कांदा लिलाव सुरू

Next

आवक कमी : लासलगावसह तीन ठिकाणी बंदच

नाशिक : गेल्या तीन दिवसांपासून बंद असलेले जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील कांदा लिलाव काही अपवादवगळता सोमवारपासून पूर्ववत सुरू झाले. जिल्ह्यातील लासलगाव,सटाणा आणि नामपूर बाजार समित्यांमध्ये लिलाव झालेले नाहीत. ते दोन दिवसात सुरू होतील, असे सांगण्यात आले. कांदा
आवक घटली असून, लिलावामध्ये सरासरी भाव १२०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले.मागील गुरुवारी आयकर विभागाने जिल्ह्यातील प्रमुख बाजार समितीतील कांदा व्यापाºयांवर धाडी टाकल्याने कांदा व्यापाºयांकडून बंद पुकारण्यात आला होता.त्यानंतर जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन् यांनी शेतकºयांच्या अडवणुकीची भूमिका घेतल्यास व्यापाºयांचे परवाने निलंबित करण्याचा इशारा दिला होता. जिल्हाधिकाºयांनी बोलाविलेल्या बैठकीत बाजार समित्या आणि व्यापारी संघटनांच्या पदाधिकाºयांनी सोमवारपासून लिलाव सुरळीत सुरू करण्याचे आश्वासन दिले होते.
जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या बाजार समित्यांमध्ये सोमवारी कांद्याची आवक नेहमीपेक्षा काहीशी कमी झाली. बाजारभाव प्रतिक्विंटल १२०० ते १५०० रुपयांदरम्यान राहिले. लिलाव बंद होण्याच्या आधी असलेल्या पातळीवरच भाव कायम राहिल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
लासलगाव, सटाण्यात लिलाव नाहीत
लासलगाव, सटाणा आणि नामपूर बाजार समितीमध्ये सोमवारी लिलाव झाले नाहीत. लासलगाव व सटाणा येथे पावसामुळे खळ्यात कांदा ठेवायला जागा नसल्याने व्यापाºयांनी लिलावात सहभाग घेतला नाही. या दोन्ही ठिकाणी मंगळवारपासून कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीतर्फे देण्यात आली. नामपूर येथील लिलाव मात्र गुरुवारपासून सुरू होणार असल्याचे सांगण्यात येते.

Web Title: Start the onion auction in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.