कांदा, शेतमाल लिलावास प्रारंभ
By admin | Published: March 10, 2017 01:15 AM2017-03-10T01:15:47+5:302017-03-10T01:16:17+5:30
सिन्नर : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पांढुर्ली उपबाजारात कांदा, शेतमाल आणि धान्य व भुसार मालाच्या लिलावास प्रारंभ करण्यात आला.
सिन्नर : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पांढुर्ली उपबाजारात कांदा, शेतमाल आणि धान्य व भुसार मालाच्या लिलावास प्रारंभ करण्यात आला.
बाजार समितीचे सभापती अरुण वाघ यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या उपस्थितीत शेतमालाच्या लिलावाचा शुभारंभ करण्यात आला. पांढुर्ली उपबाजारात दर सोमवारी, बुधवारी व शुक्रवारी कांदा व धान्य भुसार मालाचे लिलाव सुरू राहणार आहेत. शेतकऱ्यांनी पांढुर्ली उपबाजारात कांदा, शेतमाल व धान्य भुसार माल विक्रीसाठी आणावा, असे आवाहन सभापती वाघ यांच्यासह उपसभापती सोमनाथ भिसे, सचिव विजय विखे यांनी केले. यावेळी सोमनाथ उगले, लता रूपवते, अरुण वाजे, विश्राम उगले, विष्णुपंत वाजे, अशोक भोर, उपसचिव आर. एन. जाधव, आर. जे. डगळे यांच्यासह प्रभाकर हारक, दामू गायधनी, निवृत्ती तुपे, शिवाजी तुपे, शंकर तुपे, चंद्रकांत वाजे यांनी लिलावात सहभागी होऊन शेतमाल खरेदी केला. (वार्ताहर)