सटाणा बाजार समितीत रोख चुकवतीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 08:11 PM2018-08-06T20:11:27+5:302018-08-06T20:11:55+5:30
सटाणा : येथील बाजार समितीत शेतमाल विक्र ी करणाऱ्या शेतकºयांना रोख पेमेंट देण्याची सर्व व्यापाºयांना सक्ती करण्यात आली असून, सोमवारपासून (दि.६) या महत्त्वपूर्ण निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरु वात झाल्याची माहिती सभापती मंगला सोनवणे यांनी दिली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित सभापती मंगला प्रवीण सोनवणे यांच्यासह सर्व संचालकांनी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत होत आहे.कसमादे परिसरातील सर्वच बाजार समित्यांमध्ये शेतकºयांना रोखीने पेमेंट करणे बंधनकारक असताना व्यापाºयांकडून मात्र याची अंमलबजावणी केली जात नव्हती. शेतमाल विक्र ी केलेल्या मालाच्या मोबदल्यात बहुतांशी शेतकºयांना जमा पावती किंवा एक महिन्याच्या तारखेचा धनादेश दिला जात होता. अनेकवेळा व्यापाºयांनी दिलेले धनादेश बाउन्स होण्याच्या तक्र ारी बाजार समितीकडे येत होत्या. या तक्र ारींची नवनियुक्त प्रशासन मंडळाने गंभीर दखल घेत सोमवारपासून शेतक-यांना रोख स्वरूपात पेमेंट करण्याचे फर्मान सोडले होते.या निर्णयाला व्यापाºयांनी विरोध दर्शवत रोखीत व्यवहार करण्यासाठी पुरेशी रोख रक्कम मिळत नसल्याचे कारण दाखवत सोमवारी केवळ १५० वाहनांचा लिलाव करण्याची आडमुठी भूमिका घेतली होती. मात्र बाजार समिती संचालक मंडळाने रोख पेमेंटचा निर्णय कायम ठेवत संपूर्ण वाहनांचा लिलाव करावाच लागेल, अशी तंबी व्यापाºयांना दिल्याने व्यापाºयांनी नमते घेत सोमवारी सकाळच्या सत्रात कांद्याच्या २९० वाहनांचा लिलाव केला, तर सायंकाळी उर्वरित ३१४ वाहनांचा लिलाव केल्याची माहिती सचिव भास्कर तांबे यांनी दिली.
...तर तक्ररच ग्राह्य धरणार
शेतमाल विक्र ी केल्यानंतर शेतकºयांनी रोख स्वरु पात पेमेंट घ्यावे. व्यापाºयांनी रोख स्वरु पात पेमेंट न दिल्यास बाजार समितीकडे चोवीस तासांच्या आत तक्र ार करावी अन्यथा तक्र ार ग्राह्य धरली जाणार नसल्याचे बाजार समिती प्रशासनाने म्हटले आहे. तर रोखीच्या चुकवतीसंदर्भात शेतकºयाने एखाद्या व्यापाºयाविरोधात तक्र ार केल्यास संबंधित व्यापाºयाला सुटीचे दिवस वजा जाता आठ दिवस लिलावात भाग घेता येणार नसल्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.