शेतमजूरांना पेन्शन सुरू करा शेतकरी संघटनेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 09:14 PM2020-09-03T21:14:30+5:302020-09-04T00:51:16+5:30
कवडदरा : कोरोनाच्या गेल्या पाच महिन्यात अन्यायकारक धोरणांमुळे शेतकरी व शेतमजूर पुर्णत: उध्वस्त झाला आहे. केंद्र व राज्य सरकारने शेतकरी व शेतमजूर यांना तातडीने दरमहा १० हजार रूपये पेन्शन सुरू करावी अशी मागणी किसान संघटनेकडून होत आहे.

केंद्र व राज्य सरकार कोव्हिडच्या नावाखाली शेतकरी व शेतमजूरांच्या विरोधात अन्यायकारक आदेश काढत असून ते तातडीने मागे घ्यावेत. तसेच
शेतकरी व शेतमजूर यांना तातडीने दरमहा १० हजार रूपये पेन्शन सुरू करावी, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळावा, गायीच्या दुधाला ३५ रूपये लीटर व म्हशीच्या दुधाला ६० लीटर हमी भाव मिळावा, मनरेगा अंतर्गत २०० दिवसांचा रोजगार मजूरांना मिळावा, नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई मिळावी, डिझेल-पेट्रोल दरवाढ त्वरीत मागे घ्यावी आदी विविध मागण्या शेतकरी संघटनेच्यावतीने येथील शेतकरी संघटनेचे सदस्य सतिष निसरड, रवी रोंगटे यांनी केल्या आहेत.