वाळवणाचे पदार्थ तयार करण्यास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 01:07 AM2021-02-27T01:07:32+5:302021-02-27T01:08:00+5:30
वाळवणाचे पदार्थ तयार करण्यास पाळे खुर्द परिसरात महिलांची लगबग सुरू झाली आहे. माघ महिन्यात उन्हाचा तडाखा वाढल्याने वडे, नागली, उडदाचे पापड, शेवया, कुरडई करण्यासाठी भल्या पहाटे उठून महिलांची धावपळ सुरू झाली आहे.
पाळे खुर्द : वाळवणाचे पदार्थ तयार करण्यास पाळे खुर्द परिसरात महिलांची लगबग सुरू झाली आहे. माघ महिन्यात उन्हाचा तडाखा वाढल्याने वडे, नागली, उडदाचे पापड, शेवया, कुरडई करण्यासाठी भल्या पहाटे उठून महिलांची धावपळ सुरू झाली आहे.
भाजीपाल्याचे भाव वाढल्यास खर्चाचे बजेट कोलमडू नये म्हणून याच पदार्थांचा वापर करून महिला आपले घर चालविण्याचे कसब दाखवतात. बारा महिन्याचे खाद्य पदार्थ असल्याने त्यांना मोठी मेहनत घ्यावी लागते. गेल्या वर्षी याच महिन्यात कोरोना संक्रमणामुळे लॉकडाऊन झाले होते. त्यामुळे महिलांना पुरेसे किराणा साहित्य न मिळाल्याने वाळवणाचे पदार्थ फारसे करता आले नव्हते, तसेच आताही कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने व पुन्हा लॉकडाऊनचे संकेत दिल्याने महिलावर्गाने वाळवणाचे पदार्थ आताच करण्यास सुरुवात केली.