उंबरदरी धरणातून गाळ उपसा करण्यास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:13 AM2021-04-25T04:13:31+5:302021-04-25T04:13:31+5:30

ठाणगाव: सिन्नर तालुक्यातील दक्षिण भागातील ठाणगाव येथे युवा मित्र सिन्नरच्या कार्यकारी संचालिका मनीषा पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली उंबरदरी धरणातील गाळ ...

Start pumping sludge from Umbardari dam | उंबरदरी धरणातून गाळ उपसा करण्यास प्रारंभ

उंबरदरी धरणातून गाळ उपसा करण्यास प्रारंभ

Next

ठाणगाव: सिन्नर तालुक्यातील दक्षिण भागातील ठाणगाव येथे युवा मित्र सिन्नरच्या कार्यकारी संचालिका मनीषा पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली उंबरदरी धरणातील गाळ उपसा करण्याचा शुभारंभ कोरोना संदर्भातील शासनाने ठरवून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून करण्यात आला. गेल्या दोन वर्षांपूर्वी केलेल्या गाळ उपशामुळे धरणात झालेला जलसाठा व गावातील पडीत जमीन लागवडीखाली आल्याने गावकरी वारंवार युवा मित्रकडे गाळ काढून देण्याची मागणी करत. याची दखल घेत येथील ग्रामपंचायत व शेतकरी यांनी पुढाकार घेऊन ग्रामपंचायत सहकार्याने युवा मित्रच्या संकल्पनेतून टाटा ट्रस्ट व घरडा केमिकल्स यांच्या सी.एस.आर.निधीतून गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य वनिता शिंदे, माजी सरपंच नामदेव शिंदे, म्हाळुंगी नदी गाळ उपसा समिती अध्यक्ष विजय शिंदे व सचिव रावसाहेब शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

युवा मित्र संस्थेच्या कार्यकारी संचालिका मनीषा पोटे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना बंधाऱ्यातील गाळ आपल्या शेतात टाकून जमीन सुपीक करून घेण्याचे आवाहन केले. तसेच सहयोगी संचालिका शीतल डांगे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना गाळ वाहून नेण्याची संपूर्ण प्रकिया समजावून सांगून त्याबद्दल मार्गदर्शन केले.

याप्रसंगी ए.टी. शिंदे,अध्यक्ष विजय शिंदे, सचिव रावसाहेब शिंदे युवा मित्र संस्थेचे प्रकल्प समन्वयक आदिनाथ शिरसाठ, अभियंता धनंजय देशमुख, तालुका समन्वयक प्रितम लोणारे, भालचंद्र राऊत,ऋषीकेश डांगे,अमर होळकर यांच्या समवेत पाटबंधारे विभागाचे तुकाराम घाणे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

---------------

पाणीप्रश्न मिटणार

गाळ उपसा केल्यामुळे जलाशयात पाणीसाठा वाढणार असून भूगर्भातील पाण्याची पाण्याची पातळी वाढली जाणार आहे. तसेच पाच गाव पाणीपुरवठा योजनेतून ठाणगाव, पाडळी, हिवरे, पिंपळे व आशापूर या पाच गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे.

-------------------

उंबरदरी धरणातील गाळ उपसा शुभारंभ प्रसंगी युवा मित्रच्या कार्यकारी संचालिका मनीषा पोटे, शीतल डांगे, आदीनाथ शिरसाठ, प्रितम लोणारे, ए.टी. शिंदे, नामदेव शिंदे यांच्यासह गाळ उपसा समिती सदस्य व शेतकरी. (२४ ठाणगाव)

===Photopath===

240421\24nsk_28_24042021_13.jpg

===Caption===

२४ ठाणगाव

Web Title: Start pumping sludge from Umbardari dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.