धरणातील गाळ काढण्यास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 12:13 AM2018-03-03T00:13:07+5:302018-03-03T00:13:07+5:30

बागलाण तालुक्यातील जोरण येथील शेतकयांच्या पुढाकाराने विंचुरे शिवारातील पाझर तलावातील गाळ काढण्याच्या कामाला प्रारंभ झाला. परिसरातील सर्व शेतकºयांनी एकत्र येऊन गाळ काढण्याचा निर्णय घेतला होता.

 Start to remove the dam's mud | धरणातील गाळ काढण्यास प्रारंभ

धरणातील गाळ काढण्यास प्रारंभ

Next

जोरण : बागलाण तालुक्यातील जोरण येथील शेतकयांच्या पुढाकाराने विंचुरे शिवारातील पाझर तलावातील गाळ काढण्याच्या कामाला प्रारंभ झाला. परिसरातील सर्व शेतकºयांनी एकत्र येऊन गाळ काढण्याचा निर्णय घेतला होता. अनेक वर्षांपासून या धरणातील गाळ उपसाला गेला नव्हता. धरणात प्रचंड प्रमाणात गाळ साठल्यामुळे धरणाची खोली कमी झाली असून, पाणी साठवण क्षमता कमी झाली होती. धरणातील पाण्याचा फक्त दोन-तीन महिने फायदा होत होता. ऐन उन्हाळ्यात पाणी राहत नसल्याने शेतकºयांची अडचण होत असे. उपसून काढलेला गाळ शेतीसाठी उपयुक्त ठरेल व धरणाची खोली वाढून पाणी साठा जास्त होईल असा विचार करून येथील शेतकºयांनी एकत्र येत गाळ उपसा करण्याचा निर्णय घेतला.  शेतकºयांनी सार्वजनिक वर्गणी काढून जेसीबी, ट्रॅक्टर यांच्या साह्याने धरणातील गाळ उपसण्याच्या कामाला सुरुवात केली. शासनाचा कुÞठलाही निधी न घेता व कुठल्याही राजकीय पुढाºयाची मदत न मागता शेतकºयांनी स्व-खर्चातून गाळ उपसा करण्याचे काम हाती घेतले आहे.
शेतकयांनी काढली लोकवर्गणी
येथील शेतकºयांनी आपल्या परिसरातील पाझर तलाव, धरणांतील गाळ उपसा करून पाण्याची पातळी कशी टिकून राहील या विचारातून हा उपक्र म हाती घेतला आहे. या गाळाचा शेतीला उपयोग होणार आहे. नवीन पीक घेताना हा गाळ फायदेशीर ठरणार आहे. सेंद्रीय खतापेक्षा धरणातील गाळाचा अधिक फायदा होतो. या अनुषंगाने शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य करून लोकवर्गणी काढून जेसीबी, ट्रॅक्टर लावून परिसरातील तलाव, लहान-मोठ्या धरणातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे.

Web Title:  Start to remove the dam's mud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण