लोकसहभागातून गाळ काढण्यास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 11:27 PM2018-03-14T23:27:25+5:302018-03-14T23:27:25+5:30
नायगाव : सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथील व परिसरातील बंधारे व पाझर तलावातील लोक सहभागातून गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यंदाच्या वर्षी समाधानकारक पाऊस पडूनही फेब्रुवारीनंतर लगेचच शेतीसह पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे.
देशवंडी येथे लोकसहभागातून बंधाऱ्यातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ करताना सामाजिक कार्यकर्ते शरद कापडी. समवेत रमेश डोमाडे, बाळासाहेब कापसे, केशव कापडी, अशोक डोमाडे, ज्ञानेश्वर नागरे, मुरलीधर बर्केआदी.
नायगाव : सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथील व परिसरातील बंधारे व पाझर तलावातील लोक सहभागातून गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यंदाच्या वर्षी समाधानकारक पाऊस पडूनही फेब्रुवारीनंतर लगेचच शेतीसह पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे.
महिलांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे गाव परिसरातील सर्व छोटे-मोठे बंधारे व पाझर तलावांतील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ बुधवारी (दि. १४) गोदा युनियनचे उपाध्यक्ष रमेश डोमाडे व सरपंच विनता कापडी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
यावेळी उपसरपंच सुभाष बर्के, ग्रामपंचायत सदस्य केशव कापडी, शरद कापडी, मुरलीधर बर्के, बाळासाहेब कापसे, अशोक डोमाडे, नवनाथ बर्के, रघुनाथ डोमाडे, ज्ञानेश्वर नागरे, हरी बर्के,शरद डोमाडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. देशवंडी शिवारातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोलवर जात असल्याने गाव व शिवाराला अनेक दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने लोकसहभागातून होत असलेल्या गाळ काढण्याच्या कामाने सर्वच बंधाºयांची खोली वाढणार आहे.गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या पाण्याबरोबर साचणाºया गाळामुळे सर्वच बंधाºयांची साठवण क्षमता कमी झाल्याने गावाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या कामामुळे पाणी साठवण वाढण्यास मदत होईल.
- रमेश डोमाडे,
उपाध्यक्ष गोदा युनियन
लोकसहभागातून होत असलेल्या गाळ काढण्याच्या कामामुळे सर्वच शेतकºयांचा फायदा होणार असल्यामुळे ग्रामस्थांनी सहभाग वाढविण्याची गरज आहे.
- विनता कापडी, सरपंच, देशवंडी.