मळगाव बंधा-यातील गाळ काढण्यास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 05:03 PM2018-12-03T17:03:49+5:302018-12-03T17:04:10+5:30
स्वराज्य प्रतिष्ठानचा उपक्रम : पाणीटंचाईची धग कमी होणार
सटाणा : शहरात निर्माण झालेल्या भीषण पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शहरातील प्रभाग क्र मांक तीनचे नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती राहुल सुभाष पाटील यांच्या स्वराज्य प्रतिष्ठानने मळगाव बंधा-याचा मोफत गाळ काढण्यासह माती भुसभुशीत करण्याचा उपक्रम हाती घेतला असून त्यामुळे शहरातील पाणीटंचाईची धग कमी होण्यास मदत होणार मदत होणार आहे.
मळगाव बंधा-यात येथे गेल्या अनेक वर्षांपासून माती व गाळाचे खडकामध्ये रूपांतर झाले आहे. त्यामुळे विहिरींमध्ये पाणी पाझरत नाही. परिणामी शहराला भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. यावर मात करण्यासाठी मळगाव बंधा-याचा गाळ काढण्याची मागणी होत होती. त्याची दखल घेत प्रभाग क्र मांक तीनचे नगरसेवक राहुल पाटील यांच्या स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. शुभारंभप्रसंगी नगराध्यक्ष सुनील मोरे,पाणीपुरवठा सभापती राहुल पाटील,राष्ट्रवादीचे गटनेते काका सोनवणे, काँग्रेसचे गटनेते दिनकर सोनवणे,दीपक पाकळे,बाळू बागुल,दत्तूभाऊ बैताडे,नगरसेविका सुरेखा बच्छाव,भारती सूर्यवंशी, सुनीता मोरकर, डॉ.विद्या सोनवणे तसेच मुख्याधिकारी हेमलता डगळे,मनसे शहराध्यक्ष पंकज सोनवणे, राष्ट्रवादीचे राकेश सोनवणे,भाक्षीचे सरपंच योगेश सुर्यवंशी,गणेश पाटील,प्रकाश बच्छाव, रमेश भामरे,हेमंत सोनवणे,दीपक सोनवणे,नगरपालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे संजय सोनवणे, आनंदा पाटील, जनसंपर्क अधिकारी हिरालाल कापडणीस,शाम मुंडावरे,परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
शेवाळेंकडून यंत्रसामुग्री मोफत
या कामामुळे बंधा-यालगत असलेल्या पालिकेच्या विहिरीच्या पाणी पातळी मध्ये वाढ होऊन शहरास पाणीपुरवठा करण्यास मदत होणार आहे. येत्या ५ डिसेंबरला केळझर धरणातून आवर्तन सुटणार असून गाळ काढण्यासह माती भुसभुशीत करण्याचे काम करण्यात येत असल्याने शहरवासियांसह परिसरातील शेतक-यांनी समाधान व्यक्त केले आहे. या कामासाठी डॉ.तुषार शेवाळे यांच्यातर्फे कामासाठी लागणारी सर्व यंत्रसामग्री मोफत पुरवण्यात आली आहे,