गोदापात्रातील पाणवेली काढण्यास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:49 PM2021-06-18T16:49:14+5:302021-06-18T16:49:22+5:30
चांदोरी : निफाड तालुक्यातील सायखेडा ते चाटोरी या एक किलोमीटर अंतरातील गोदावरी नदीपात्रातील पाणवेली बोटीच्या साह्याने काढण्यास गुरुवार (दि. ...
चांदोरी : निफाड तालुक्यातील सायखेडा ते चाटोरी या एक किलोमीटर अंतरातील गोदावरी नदीपात्रातील पाणवेली बोटीच्या साह्याने काढण्यास गुरुवार (दि. १७) पासून प्रारंभ झाला आहे. जलसंपदा विभागाच्या वतीने पाणवेली काढण्यात येत असल्याने गोदाकाठच्या गावांना दिलासा मिळाला आहे.
मागील एक महिन्यापासून पाणवेलीचा प्रश्न प्रलंबित होता. स्थानिक नागरिक व ह्यह्यलोकमतह्णह्णच्या माध्यमातून वारंवार पाठपुरावा होत अखेर जलसंपदा विभागाने पाणवेली काढण्यास सुरुवात केली आहे.
पाणवेलीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी दूषित होत आहे. तसेच जलचर प्राण्यांचा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. पाणवेली या संपूर्ण पात्रात पसरलेल्या आहेत. पावसाळ्यात नदी दुथडी भरून वाहू लागली अथवा पूरसदृश स्थिती निर्माण झाल्यास या पाणवेली पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण करतात व पाणी नदीकाठावरील शेतात शिरते व पिकांचे नुकसान होते.
पाणवेलींचा पाण्याला धोका
अडथळा निर्माण झाला तर पूरपरिस्थितीचा धोका अधिक वाढतो. तसेच चांदोरी-सायखेडा पुलाला धोका निर्माण होतो.
त्याच पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने उशिरा का होईना पाणवेलीचे गांभीर्य लक्षात घेऊन सायखेडा ते चाटोरी यादरम्यानच्या पाणवेली यांत्रिक बोटीच्या साह्याने काढण्यास सुरुवात केली आहे. चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापनाचे १५ जणांचे पथक हे काम करत आहे.
-------------
गोदावरीच्या पात्रात असलेल्या या पाणवेलीमुळे जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले होते. पावसाळ्यात नदीच्या पाण्याची पातळी वाढते, त्यात पाणवेली पाणी प्रवाहाला अडथळा निर्माण करतात. परिणामी पाणी जवळील शेतात शिरते व पिकांचे नुकसान होते.