रस्ता दुरुस्तीस प्रारंभ

By Admin | Published: October 30, 2016 02:23 AM2016-10-30T02:23:39+5:302016-10-30T02:24:06+5:30

तातडीने दखल : वाहनचालकांसह परिसरातील नागरिकांमध्ये समाधान

Start road repair | रस्ता दुरुस्तीस प्रारंभ

रस्ता दुरुस्तीस प्रारंभ

googlenewsNext

द्याने : नामपूर-द्याने या रस्त्याच्या डागडुजीस अखेर प्रारंभ झाला असून, वाहनचालकांसह परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.  या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत ‘लोकमत’मध्ये दि. १९ आॅक्टोबर रोजी वृत्त प्रसिद्ध झाले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या वृत्ताची तातडीने दखल घेत कामास सुरुवात केली आहे.  नामपूर-द्याने रस्त्याची दुरवस्था झाली असून, खामलोण फाटा ते टेकडीपर्यंतचा रस्ता खड्ड्यांमध्ये हरवला होता.  दुचाकीचालकांना या मार्गावरून प्रवास करताना कसरत करावी लागत होती. सदरचा रस्ता गुजरात   राज्यात जाण्यासाठी सोयीचा असून, वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे नामपूर-द्याने मार्ग मृत्यूचा सापळा बनला होता. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला, तर अनेकांना कायमस्वरु पी अपंगत्व आले आहे. रस्ता रुंदीकरणांचा प्रश्न अनेक दिवसांपासून रेंगाळत पडला होता. अनेक दिवसांपासून द्याने गावाजवळील अपघाती वळणावर दिशादर्शक फलक नसल्याने अपघात होत असतात. द्याने ते आसखेडा गावापर्यंत साईडपट्ट्या खोल गेल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागते. अनेकदा हुज्जत घालून रस्ता द्यावा लागतो. अवैध वाहतूक करणाऱ्या टॅक्सी व अ‍ॅपेरिक्षा क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करत असतात. अशा वाहनचालकांवर किरकोळ कारवाई करण्यात येते. परत ये रे माझ्या मागल्या सुरू होतात. दुचाकीचालकांना रात्रीच्या वेळी जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता.  चोरट्यांनी दिशादर्शक फलक लंपास केल्याने बांधकाम विभागाचे कर्मचारी नवीन फलक लावण्याची तसदी घेत नाहीत. मैलबिगारी तात्पुरत्या स्वरूपात माती टाकून खड्डे बुजवित होते. या चार किलोमीटर अंतरासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता. (वार्ताहर)



 

Web Title: Start road repair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.