रस्ता सुरक्षा अभियानास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 10:07 PM2019-01-23T22:07:44+5:302019-01-23T22:11:07+5:30
सटाणा : तालुक्यातील जायखेडा पोलीस ठाण्याच्यावतीने रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत नामपूर बाजार समिती आवारात हेल्मेट वापर तसेच रिफ्लेक्टरचा वापर याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव, शेतकरी व व्यापारी आणि हमाल यांना मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात येत आहे.

या अंतर्गत नामपूर बाजार समिती आवारात आयोजित कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब भामरे होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी हेल्मेट सक्ती बाबत माहिती दिली. हेल्मेट घालून दुचाकी चालविणे, सीटबेल्ट लावून कार चालविणे, टॅÑक्टर ट्रॉलीच्या मागील बाजूस रिफ्लेक्टर लावणे अशा छोट्या परंतु महत्वाच्या बाबींची काळजी घेतल्यास अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकते असेही त्यांनी सांगितले. यावेळी समितीचे उपसभापती लक्ष्मण पवार, संचालक कृष्णा भामरे, भाऊसाहेब अहिरे, अविनाश सावंत, भाऊसाहेब कांदळकर, संजय भामरे, दीपक पगार, हेमंत कोर, शांताराम निकम, मधुकर चौधरी, आनंदा मोरे, अविनाश निकम, दत्तू बोरसे, सचिन मुथा, चारु शीला बोरसे, चंद्रभागा शिंदे, अनिल बोरसे, दादाजी खैरनार, डॉ. दिग्पाल गिरासे, अरु ण अहिरे, शरद बोरसे, संजय पाटील आदी उपस्थित होते.
हमाल करणार हेल्मेटचा जागर ...
जायखेडा पोलीस ठाण्याच्या हेल्मेट वापराच्या आवाहनाला प्रतिसाद देत नामपूर बाजार समितीच्या माथाडी युनियन कामगारांनी तब्बल ८० हेल्मेटची मागणी केली आहे.प्रजासत्ताक दिनाचे औचित्यसाधून नामपूर गावातून हेल्मेट घालून मोटरसायक रेली काढून जनजागृती केली जाणार असल्याचे हमाल मापारी संचालक दत्तू बोरसे यांनी जाहीर केले.