लावणी चौफुलीवरील उड्डाणपुलाचे पथदीप सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 12:17 AM2019-02-03T00:17:19+5:302019-02-03T00:19:35+5:30
पिंपळगाव बसवंत : मुंबई-आग्रा महामार्गावरील वणी चौफुलीवरील उड्डाणपुलाचे पथदीप सुरू करण्यात आले असून, त्यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले जात आहे.
वणी चौफुलीवर पथदीप सुरू झाल्याने उजळून निघालेला उड्डाणपूल.
पिंपळगाव बसवंत : मुंबई-आग्रा महामार्गावरील वणी चौफुलीवरील उड्डाणपुलाचे पथदीप सुरू करण्यात आले असून, त्यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले जात आहे.
महामार्ग विस्तारीकरणात पिंपळगावच्या वणी चौफुलीवर उड्डाणपूल साकारला आहे. त्यामुळे वणी चौफुलीवर वाहतूक कोंडी काही प्रमाणात तरी टळली आहे. उड्डाणपूल उभारताना रात्री वाहनचालकांचा सुकर व्हावा यासाठी पथदीप लावण्यात आले असून, ते शोभेचे बाहुले बनले होते. ते पथदीप नादुरु स्त झाल्याने बत्ती गुल होऊन गेल्या दोन तीन महिन्यापासून बंद अवस्थेत असल्याने याठिकाणी काळोख पसरलेला होता.
याबाबतचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध झाल्याने तातडीने पथकर वसुली करणारे प्रशासन जागे झाले व वणी चौफुली परिसरातील पथदीप सुरू करण्यात आले. पथदीप सुरू झाल्याने परिसर उजळून निघाला.
मात्र सध्या पथकर वसुली करणाऱ्या कंपनीचे महामार्गाच्या देखभालीकडे दुर्लक्ष असल्याचे दिसते. कारण महामार्गावरील अनेक पथदीप बंदावस्थेत असतात.ठेकेदारांनी कर्तव्याचा विसर न पडता पथदीपांची देखभाल कायम अशीच सुरू ठेवली तर येथे काळोख न होता प्रवाशांच्याही जिवावर बेतणार नाही. आम्हालाही रस्त्यावर उतरण्याची वेळ येणार नाही.
- अक्षय विधाते, युवा सेना, पिंपळगाव बसवंत
वणी चौफुलीचे दिवे गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद अवस्थेत होते. तरीसुद्धा त्याकडे राष्ट्रीय महामार्ग देखभाल विभागाने लक्ष दिले नाही. लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच नादुरु स्त पथदीप उजळले.
- अमित डेरे
सामाजिक कार्यकर्ते.