निफाड ,चांदोरी, ओझर, पिंपळगाव, लासलगावी आरटीपीसीआर चाचण्या सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:13 AM2021-05-17T04:13:03+5:302021-05-17T04:13:03+5:30

लासलगाव : निफाड, चांदोरी, ओझर, पिंपळगाव, लासलगाव येथे आरटीपीआर चाचण्या सुरू कराव्यात अशा सूचना खासदार ...

Start RTPCR tests at Niphad, Chandori, Ojhar, Pimpalgaon, Lasalgaon | निफाड ,चांदोरी, ओझर, पिंपळगाव, लासलगावी आरटीपीसीआर चाचण्या सुरू करा

निफाड ,चांदोरी, ओझर, पिंपळगाव, लासलगावी आरटीपीसीआर चाचण्या सुरू करा

Next

लासलगाव : निफाड, चांदोरी, ओझर, पिंपळगाव, लासलगाव येथे आरटीपीआर चाचण्या सुरू कराव्यात अशा सूचना खासदार डॉ. भारती पवार यांनी अधिकाऱ्यांना निफाड आढावा बैठकीत दिल्या.

कोरोनाची दाहकता लक्षात घेता निफाड तालुक्याची आढावा बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत निफाड तालुक्यातील कोविड सेंटर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र याचा आढावा घेण्यात आला. त्याचप्रमाणे बाधित रुग्णांची ट्रेसिंग कशा प्रकारे केले जाते त्याची सविस्तर माहिती देण्यात आली. निफाड ,चांदोरी, ओझर, पिंपळगाव, लासलगाव या ठिकाणी लवकरात लवकर आरटीपीसीआर चाचण्या सुरू करण्यात याव्यात अशी सूचना डॉ. पवार यांनी केली. त्याचप्रमाणे घरातच विलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या हातावर शिक्का मारण्यात यावा. अशा नागरिकांवर लक्ष ठेवण्यात यावे. त्यांना फिरण्यापासून मज्जाव करण्यात यावा त्यासाठी पोलीस यंत्रणेने अधिक सतर्क राहावे. निफाड, पिंपळगाव, लासलगाव या ठिकाणी किती ऑक्सिजन बेड आहेत, किती व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत व किती रुग्ण ॲडमिट आहेत याचा आढावा घेण्यात आला. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत चर्चा केली. अनेक व्यापाऱ्यांनी द्राक्ष बागायतदारांचे पैसे बुडवले त्यासंदर्भातदेखील पोलिस यंत्रणेने लक्ष घालून बुडालेले पैसे मिळवून देण्यास मदत करावी अशी सूचना पवार यांनी केली. गोदाकाठ परिसरातील गावे बघता त्या ठिकाणी आरोग्य यंत्रणेने थोडे अधिक लक्ष देऊन भविष्यात कोरोना आटोक्यात राहील त्या अनुषंगाने चांदोरी येथे कोविड टेस्ट चालू करण्यात यावी असे सांगितले. बैठकीप्रसंगी निफाडच्या प्रांताधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार घोरपडे, गटविकास अधिकारी संदीप कराड, मुख्याधिकारी मेतकर, निफाड नगरपंचायतच्या मुख्याधिकारी श्रेया देवचक्के, पोलीस निरीक्षक आर. बी. सानप, डॉ. चेतन काळे, डॉ. रोहन मोरे, भाजपा तालुकाध्यक्ष भागवत बाबा बोरस्ते, शंकरराव वाघ, सुवर्णा जगताप ,जगन कुटे, संजयजी गाजरे, आदेश सानप, संजय धारराव, बापू पाटील, सतीश मोरे, अल्पेश पारख, डॉ. सारिका डेर्ले, डॉ. विजय डेर्ले, रमण सुराणा ,संजय वाबळे, गोविंद कुशारे, प्रशांत घोडके, आबा गडाख, संदीप टर्ले, रवी सानप, विशाल पालवे, चिंधू काळे, संदीप झुटे उपस्थित होते.

Web Title: Start RTPCR tests at Niphad, Chandori, Ojhar, Pimpalgaon, Lasalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.