येवल्यात साई संगीतमय कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 04:11 PM2019-01-09T16:11:52+5:302019-01-09T16:12:18+5:30
येवला : शहरात परदेशी महिला प्रतिष्ठानच्या वतीने साईबाबा महासमाधी शताब्दी सोहळ्यानिमित्त श्री साई संगीतमय कथा व ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन येथील महाराणा प्रताप मंगल कार्यालयात करण्यात आले आहे.
येवला : शहरात परदेशी महिला प्रतिष्ठानच्या वतीने साईबाबा महासमाधी शताब्दी सोहळ्यानिमित्त श्री साई संगीतमय कथा व ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन येथील महाराणा प्रताप मंगल कार्यालयात करण्यात आले आहे.
सोहळ्याचे उद्घाटन विजया परदेशी, मायाताई परदेशी, संगीता परदेशी, सोनल परदेशी, रूपाली परदेशी, सलोखा परदेशी, विनता परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले. सप्ताहात गोपाळ महाराज देशमुख, रा. बीड संगीतमय कथा ज्ञानयज्ञाचे निरूपण करीत आहेत. त्यांच्यासोबत गायनात शंभू सुतार, राहुल ओवाळ, ढोलकवादक प्रतीक पांडे, उमेश टेकाळे यांच्यासह शशिकांत सरोदे, प्रवीण गरु ड हे साथ संगत देणार आहेत. गेले चार दिवस साईबाबांचे शिर्डीत आगमन, ध्यान, बायजमा व साई यांची भेट, साईबाबांचे चमत्कार या विषयावर निरूपण झाले. ९ जानेवारी संगीतमय कथेची सांगता व त्यानंतर गुरु वारी १० जानेवारी, येवल्यात प्रथमच महिलांनी तयार केलेले ढोलपथक व झांजपथकासह मिरवणूक व महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे.
कार्यक्र म यशस्वीतेसाठी परदेशी प्रतिष्ठान, बुंदेलपुरा तालीम संघ, मुंबादेवी ग्रुप, टक्कर गणेश मंडळ, स्वप्नपूर्ती प्रतिष्ठान, साई सेवा भक्त परिवार, संत रोहिदास मंडळ, त्रिमूर्ती गणेश मंडळ, जय शंभो नारायण प्रतिष्ठान प्रयत्नशील आहेत. . ज्ञानयज्ञ यशस्वी करण्यासाठी दिनेश परदेशी, निरंजन परदेशी, बंटी परदेशी,धीरज परदेशी, अशोक गुजर, विशाल संगम, आकाश परदेशी, मनोज रसाळ, मयूर कायस्थ, अक्षय शिंत्रे विशेष परिश्रम घेत आहे.
==================