चास येथे ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 05:55 PM2018-09-26T17:55:02+5:302018-09-26T17:56:18+5:30

सिन्नर तालुक्यातील चास येथे जिल्हा परिषद नाशिक, पंचायत समिती सिन्नर स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत स्वच्छता ही सेवा अभियान मोहिमेस पंचायत समिती उपसभापती जगन्नाथ भाबड यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.

 Start of 'Sanitation Sanitation' campaign at Chas | चास येथे ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानास प्रारंभ

चास येथे ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानास प्रारंभ

Next

राज्यातील सर्व नागरी स्वराज्य संस्थांमध्ये १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोंबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा हा विषय घेवून मोहिम राबविण्यात येत आहे. चास येथे ग्रामपंचायत, भोजापूर खोरे हायस्कूल परिसरासह गावातील विविध ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य कचरू खैरनार, पोलीस पाटील प्रयाग जाधव, ग्रामसेवक वाकचौरे, दगडू भाबड, गोविंद भाबड, आत्माराम भाबड, दीपक खैरनार, भारत भाबड, भानुदास भाबड, भाऊसाहेब भाबड, आनंदा गडाख, विठोबा खैरनार, अंकुश भाबड, भोजापूर खोरे हायस्कूलचे मुख्याध्यापक शशीकांत शिरसाठ, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title:  Start of 'Sanitation Sanitation' campaign at Chas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.