संस्कृत नाट्य स्पर्धेला आजपासून प्रारंभ
By admin | Published: December 26, 2015 10:16 PM2015-12-26T22:16:47+5:302015-12-26T22:20:50+5:30
संस्कृत नाट्य स्पर्धेला आजपासून प्रारंभ
नाशिक : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ५५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी संस्कृत नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी नाशकात उद्यापासून (दि.२७) रंगणार असून, सकाळी ११ वाजता या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.
परशुराम साईखेडकर नाट्यगृहात येत्या ३१ डिसेंबरपर्यंत ही स्पर्धा होणार आहे. उद्या प्रा. डॉ. लीना हुन्नरगीकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होईल. स्पर्धेत पाच दिवसांत एकूण वीस नाटके सादर होणार आहेत. उद्या दुपारी १२.३० वाजता सांगलीच्या संस्कारज्योती संस्थेच्या वतीने ‘विशतिचक्र’ नाटकाचा प्रयोग होणार आहे.
परीक्षक म्हणून श्रीरंग बापट (पुणे), तरंगिणी खोत (मुंबई), अंजली पर्वते (पुणे) काम पाहणार आहेत. सदर स्पर्धेतील नाटके पाहण्यासाठी शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नागरिकांना खुला प्रवेश असल्याचे समन्वयक राजेश जाधव यांनी कळवले आहे. (प्रतिनिधी)