शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 11:51 PM2019-12-13T23:51:01+5:302019-12-14T00:46:53+5:30

नाशिक महानगरपालिका शिक्षण विभाग आणि शहर विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ४५ वे नाशिक शहर विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन सेंट फिलोमिना हायस्कूलमध्ये उत्साहात पार पडले.

Start of school-level science exhibition | शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनास प्रारंभ

शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनास प्रारंभ

Next
ठळक मुद्दे२७५ प्रकल्प : मनपा शिक्षण विभाग, विज्ञान अध्यापक संघाचा संयुक्त उपक्रम

नाशिकरोड : नाशिक महानगरपालिका शिक्षण विभाग आणि शहर विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ४५ वे नाशिक शहर विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन सेंट फिलोमिना हायस्कूलमध्ये उत्साहात पार पडले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मनपा शिक्षण समितीच्या सभापती सरिता सोनवणे, महिला व बालकल्याण सभापती हेमलता कांडेकर, शिक्षण समिती सदस्य स्वाती भामरे, नगरसेवक राहुल दिवे, मीराताई हांडगे, विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष शैलेंद्र घुगे, कार्याध्यक्ष अनिल माळी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांची समायोचित भाषणे झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनपा शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश खांडबहाले व आभार सुरेश हिरे, केंद्रप्रमुख कैलास ठाकरे यांनी मानले. यावेळी विज्ञान अध्यापक संघाचे उपाध्यक्ष उत्तम बस्ते, सहकार्यवाह अंजली ठोके, खजिनदार हेमंत पाटील, सहखजिनदार अस्मिता धोतरकर, प्रसिद्धी विभागप्रमुख भागिनाथ घोटेकर, मुख्याध्यापक अ‍ॅसिस फर्नांडीस, लूसी भोये, ललिता डाल मेट आदींसह शिक्षक उपस्थित होते.
या प्रदर्शनामध्ये शहरातील विविध शाळेतील प्राथमिक विभागातून १७८, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातून ९७ प्रकल्प सादर केले आहेत. तसेच प्राथमिक शिक्षक शैक्षणिक साधने ३९ व माध्यमिक शिक्षक शैक्षणिक साधने ७ व परिचर चार प्रतिकृती सादर करण्यात आल्या आहेत.

Web Title: Start of school-level science exhibition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.