आरटीईच्या दुसऱ्या फेरीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:30 AM2018-04-22T00:30:21+5:302018-04-22T00:30:21+5:30

आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागातर्फे शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांसाठी शुक्र वारी (दि.२०) दुसरी सोडत जाहीर करण्यात आली. या सोडतीत १९०२ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली असून, शनिवार (दि. २१) पासून दुसºया फेरीची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे.

 Start of second round of RTE | आरटीईच्या दुसऱ्या फेरीस प्रारंभ

आरटीईच्या दुसऱ्या फेरीस प्रारंभ

Next

नाशिक : आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागातर्फे शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांसाठी शुक्र वारी (दि.२०) दुसरी सोडत जाहीर करण्यात आली. या सोडतीत १९०२ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली असून, शनिवार (दि. २१) पासून दुसºया फेरीची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे.  दुसºया फेरीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना १० मे पर्यंत प्रत्यक्ष शाळेत जाऊन प्रवेशप्रक्रि या पूर्ण करावी लागणार असून, दुसºया फेरीत एक किलोमीटर ते तीन किलोमीटर अंतर असलेल्या विद्यार्थ्यांच्या अर्जांचा समावेश आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या पाल्यांसाठी नर्सरी व पहिलीसाठी राखीव असलेल्या २५ टक्के जागांसाठी पहिली फेरी पार पडल्यानंतर दुसरी सोडत काढण्यात आली आहे. पहिल्या सोडतीमध्ये निवड झालेल्या ३ हजार विद्यार्थ्यांपैकी २१८२ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. आरटीईच्या सहा हजार ५८९ जागांसाठी दहा हजारांवर आॅनलाइन अर्ज आले आहेत. दुसºया फेरीसाठी १९०२ विद्यार्थ्यांची निवड होऊन १० मे पर्यंत मुदत आहे.

Web Title:  Start of second round of RTE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा