‘शिस्तबद्ध’ पद्धतीने मद्यविक्री सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 11:24 PM2020-05-08T23:24:32+5:302020-05-09T00:10:17+5:30
नाशिक : गेल्या महिनाभरापासून मद्यासाठी आसुसलेल्या नागरिकांसाठी अखेरीस शुक्रवारी (दि. ८) मद्याची दुकाने खुली झाली. जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या अटींचे पालन करीतदेखील सकाळी ९ पासूनच अनेक भागात रांगा लागल्या होत्या. तथापि, यानंतरही नाशिकरोड येथे गर्दी झाल्याने एकाचे डोके फुटण्याची घटना घडली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात अत्यंत काटेकार नियम घालून दिले असून, त्यानुसार ग्राहकांना टोकन देऊन मद्यविक्री करून दिली जात आहे. सकाळी ९ ते ५ अशी दुकाने खुली ठेवण्याची वेळ देण्यात आल्याने शुक्रवारी (दि.८) सकाळपासूनच शहरात मद्याच्या दुकानांच्या समोर रांगा लागल्या होत्या. मात्र, दुकानदारांनी आखून दिलेल्या चौकटीत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मद्यविक्री सुरू होती. जवळपास सर्वच दुकानांच्या भोवती पोलीस बंदोबस्त होता.
-------नाशिकरोड येथील सुभाषरोड येथे मद्याच्या दुकानावरील गर्दी झाल्यानंतर पोलिसांनी ती हटवित असताना एकाच्या डोक्यालाच काठीचा मार बसल्याने मद्यासाठी डोके फोडून गेल्याची वेळ संबंधितावर आली.