चांंदवड तालुक्यात पेरण्यांना प्रारंभ; कांद्याचे १६ हजार हेक्टर क्षेत्र वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 09:24 PM2020-06-16T21:24:51+5:302020-06-17T00:25:04+5:30
चांदवड : तालुक्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ४५,४३४ हेक्टर असून, यावर्षी खरीप २०-२१ करिता शासनाने ४१,८९४ लक्षांक निश्चित केलेले आहे. सदर क्षेत्रामध्ये कांद्याच्या लागवडीत १६ हजार हेक्टर क्षेत्राची वाढ अपेक्षित आहे.
चांदवड : तालुक्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ४५,४३४ हेक्टर असून, यावर्षी खरीप २०-२१ करिता शासनाने ४१,८९४ लक्षांक निश्चित केलेले आहे. सदर क्षेत्रामध्ये कांद्याच्या लागवडीत १६ हजार हेक्टर क्षेत्राची वाढ अपेक्षित आहे.
नेहमीच दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चांदवड तालुक्यात गेल्या वर्षी बºयापैकी पाऊस झाल्याने यंदाही चांगला पाऊस होईल. या आशेवर शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी केली आहे. शेतकरी खरीप पेरणीपूर्व मशागतीच्या अंतिम तयारीत आहे. तालुक्यात अजूनही बºयाच भागात पाहिजे तशा पाऊस झाला नसला तरी दमदार पावसाच्या अपेक्षेवर शेतकºयांनी खरिपाची तयारी सुरू केली असल्याचे दिसत आहे. कोरोना संकटामुळे दोन ते अडीच महिन्यांपासून सर्वच व्यवसाय धोक्यात आले. त्याला शेती व्यवसायही अपवाद ठरला नाही. हवालदिल झालेला शेतकरी पुन्हा कंबर कसून खरीप कामास लागल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे. तालुक्यात यंदा पीक पॅटर्न बदललेला दिसतो आहे. शेतकºयांचा कल हा कांदा, सोयाबीन, मका या पिकांकडे दिसून येत आहे.मागील वर्षीच्या तुलनेत मक्याचे १९ हजार हेक्टर लागवड क्षेत्र होते. ते कमी होऊन १६ हजार हे. अपेक्षित आहे. सोयाबीन क्षेत्राची मागील यावर्षी ८३०७ हेक्टर पेरणी अपेक्षित आहे.
तालुक्यात खरीप हंगामात सोयाबीन, मका व कांदा या प्रमुख पिकांची लागवड केली जाते. खरीप हंगामाच्या तयारीस शासन व शेतकरी १५ मेपासून लागला आहे. चालू हंगामाच्या सुरु वातीस कोविड -१९चा प्रादुर्भाव असल्याने शासनाने शेतकºयांच्या बांधावर जाऊन खत व बियाणे पुरवठ्याचे नियोजन केले होते.
-----------------------
४मागील वर्षी लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने यंदा मका पिकाचे क्षेत्र कमी होऊन सोयाबीन व कांदा लागवडीकडे शेतकºयांचा कल आहे. जून महिन्याच्या सुरु वातीस पूर्व भागात पावसाने हजेरी लावल्याने पेरणीस सुरु वात झाली आहे. पूर्व भागातील काही गावांमध्ये आतापर्यंत
३० ते ४० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
----------------
मागील वर्षी मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळल्याने शासनाने अळी नियंत्रणाबाबत तांत्रिक माहिती व्हॉट्सअॅप क्लिपद्वारे दिलेली आहे. शेतकºयांच्या गावबैठका व शेतीशाळा घेऊन क्षेत्रीय स्तरावरील कर्मचारी याबाबत मार्गदर्शन करत आहेत.
-------------------
चांदवड तालुक्यात मका पिकावरील लष्करी अळीचे नियंत्रण करण्यासाठी सर्व क्षेत्रीय कर्मचाºयांना प्रशिक्षित केले असून, शेतकरी वर्गास इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे माहिती पुरवण्यात येत आहे. पुढील महिन्याभरात याबाबत प्रत्येक गावात गावबैठका घेऊन शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
- राजेंद्र साळुंके
तालुका कृषी अधिकारी,
चांदवड