जिल्ह्यात पेरण्यांना प्रारंभ
By Admin | Published: June 29, 2017 01:03 AM2017-06-29T01:03:56+5:302017-06-29T01:04:08+5:30
जोरण : परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने बळीराजा सुखावला असून, शेत मशागत व पेरण्यांच्या कामाला वेग आला आहे. पावसाने हजेरी लावल्याने परिसरात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जोरण : परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने बळीराजा सुखावला असून, शेत मशागत व पेरण्यांच्या कामाला वेग आला आहे. पावसाने हजेरी लावल्याने परिसरात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. परिसरात आसखेडा, मोराणे, उत्राणे, खामलोण, फोपीर, कोटबेल, गोराणे, द्याने, श्रीपूरवडे भागात वेळेवर पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरण्या पूर्ण केल्या आहेत, तर काही ठिकाणी सुरू आहेत. मका, बाजरी, भुईमूग, मूग या पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. डाळींब पिकावर तेल्या व मर रोगाने थैमान घातले आहे. मोसम परिसरात हे नगदी पीक म्हणून ओळखले जाते. मात्र सध्या त्याचा खर्चही निघणे दुरापास्त झाल्याने अनेक बागांवर कुऱ्हाड चालविण्याची वेळ आली आहे. मातीमोल भावाने विकले जाणारे कांदा पीक घेणे शेतकऱ्यांनी यंदा टाळले आहे. मका लावण्याचे प्रमाण वाढल्यामुळे यंदा पिकाचे क्षेत्र वाढणार आहे. मका लागवडीकडे कल वाढल्याने यंदा समाधानकारक पाऊस झाल्यास मका पिकाचे क्षेत्र वाढणार आहे. भाजीपाला मातीमोल भावात विकावा लागत असल्याने शेतकरी पारंपरिक शेतीला कंटाळला आहे. कारण मजुरी, महागडे बियाणे, मजूरटंचाई यांचा ताळमेळ बसत नसल्यामुळे शेती व्यवसाय तोट्यात चालला आहे.