रब्बी हंगामातील गव्हाच्या पेरणीला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 20:09 IST2020-11-02T20:09:03+5:302020-11-02T20:09:55+5:30
पिंपळगाव लेप : परिसरात रब्बी हंगामातील गव्हाच्या पेरणीला प्रारंभ झाला आहे. तर यावर्षी गव्हाच्या पेरणी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

पिंपळगाव लेप (ता. येवला) येथे रब्बी हंगामातील गव्हाची पेरणी ट्रॅक्टरच्या सहाय्याने करतांना शेतकरी.
लोकमत न्युज नेटवर्क.
पिंपळगाव लेप : परिसरात रब्बी हंगामातील गव्हाच्या पेरणीला प्रारंभ झाला आहे. तर यावर्षी गव्हाच्या पेरणी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
यंदा अवकाळी पावसाने खरीप हंगामातील कांद्याचे रोपे तसेच सोयबीन आदी पिके उध्वस्त केली. झालेला खर्च ही निघणे अवघड असतांनाही बळीराजा रब्बी हंगामातील पिक उभे करण्यासाठी कंबरखोचून तयारीला लागला आहे. तोंडावर आलेला दिवाळ सणा निमित्ताने होणारा खर्च आणि पिके उभी करण्यासाठी लागणारे भांडवल या दोन अर्थिक संकटात शेतकरी सापडला असल्याचे चित्र आहे.
यंदा कोरोना, अवकाळी व वादळी पावसाने झालेले नुकसान सोसूनही शेतकरी नव्या उमेदीने रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका आदी पिकांना पसंती देऊन ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरण्या करत आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शेती कामातून दोन पैसे मिळवण्यासाठी मजूरांसह, ट्रॅक्टरचालकही झटतांना दिसून येत आहे. तर शेती कामांनाही परिसरात वेग आला आहे.
कोट -
यंदा कांदा रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांदा बियाणांची भाववाढ, उगवण्याची हमी नसल्याने यावर्षी कांदा लागवडी अतिशय कमी प्रमाणात होत आहे. तर गव्हाचे क्षेत्र वाढत आहे. गहू पेरण्यांचे प्रमाण परिसरात वाढले आहे.
- कैलास लांडबिले, शेतकरी, पिंपळगाव लेप.