नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया विभाग सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 05:45 PM2021-05-25T17:45:55+5:302021-05-25T17:51:40+5:30
नाशिक : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढल्याने रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस आजाराची लक्षणे जाणवत आहेत. नाशिक जिल्ह्यातील देखिल म्युकरमायकोसिस रुग्ण आढळुन येत असल्याने रुग्णांवर उपचार करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात जिल्हा शासकीय रुग्णालयात म्युकरमायकोसिस रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र शस्त्रक्रिया विभाग सुरू करावा तसेच रूग्णांना लागणाऱ्या इंजेक्शनची संख्या वाढवून दयावी अशा सूचना विधानसभा हंगामी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी नाशिक जिल्ह्यासाठी बोलविलेल्या आरोग्य विभाग विशेष बैठकीत केल्या.

नाशिक जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढत चालल्याने रुग्ण संख्या झपाट्याने वाढत होती. त्यातच कोरोनामुळे रूग्णांना म्युकर मायकोसिस आजाराचा सामना करावा लागत आहे सद्यस्थितीत कोरोना रुग्ण संख्या कमी झाली असली तरी म्युकर मायकोसिस आजारामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता सर्वाधिक आहे. त्यातच म्युकरमायकोसिस आजारावर उपचार करणे सर्वसामान्य जनतेला परवडणारे नाही त्यासाठी खूप आर्थिक खर्च लागतो. म्युकरमायकोसिस आजाराने ग्रस्त प्रत्येक रुग्णास दररोज चार ते पाच इंजेक्शन लागते. जिल्ह्यातील रुग्ण संख्या लक्षात घेऊन नाशिक जिल्ह्याची एकूण रोज गरज एक हजार ते बाराशे इंजेक्शन गरजेचे आहे. मात्र प्रत्यक्षात २०० ते २५० इंजेक्शन उपलब्ध होतात त्यामुळे इंजेक्शन पुरवठा वाढवावा. तसेच म्युकर मायकोसिस साथरोग रुग्णास येणारा खर्च किमान सात लाख रुपये असून म्युकरमायकोसिस साथरोग आजारावर उपचार करणाऱ्या हॉस्पिटलचा समावेश महात्मा फुले जन आरोग्य योजनेत करणे गरजेचे आहे. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात म्युकरमायकोसिस आजारावर शस्त्रक्रिया होत नसल्याने रूग्णांची गैरसोय होते. त्यामुळे नाशिक जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र शस्त्रक्रिया विभाग सुरु करावा. डेडिकेटेड म्युकरमायकोसिस साथरोग हॉस्पिटल घोषित करणे यावर चर्चा करण्यात येऊन रुग्णांना आवश्यक वैद्यकीय सेवा वेळीच उपलब्ध करून दिली पाहिजे अशा सुचना झिरवाळ यांनी बैठकीत केली.
या ऑनलाईन बैठकीत जिल्हाधिकारी सुरज मांढरे, नाशिक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. थोरात, महापालिका आयुक्त कैलास जाधव, सहभागी झाले होते.