राज्यस्तरीय प्राध्यापकांच्या प्रशिक्षण वर्गास प्रारंभ
By admin | Published: December 29, 2015 10:22 PM2015-12-29T22:22:58+5:302015-12-29T23:40:15+5:30
राज्यस्तरीय प्राध्यापकांच्या प्रशिक्षण वर्गास प्रारंभ
सातपूर : संदीप फाउण्डेशन संचिलत संदीप पॉलिटेक्निक महाविद्यालयात एमएसबीटी प्रायोजित राज्यातील प्राध्यापकांसाठी एक आठवड्याचे प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ करण्यात आला.
़़प्राध्यापकांसाठी आयोजित राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिराच्या उद््घाटनप्रसंगी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य ज्ञानदेव नाथे यांनी सांगितले की, विद्यार्थीकेंद्रित उपयोजित तंत्रशिक्षणापासून समाजाची उन्नती शक्य असल्याचे प्रतिपादन केले. याप्रसंगी प्रा.संजीव शुक्ला, प्रा. विशाल ओहोळ यांनी शिबिराची माहिती विषद केली.आठवडाभर चालणाऱ्या या शिबिरात सातत्याने बदल होत आहे. प्रमुख पाहुणे म्हणून संदीप फाउण्डेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप झा, मेंटर पी. आय. पाटील, महाव्यवस्थापक मोहिनी पाटील, प्राचार्य एस. टी. गंधे, प्राचार्य डॉ. आर. जि. तातेड, प्राचार्य डॉ. ए. जि. जाधव आदि उपस्थित होते. राज्यातील विविध महाविद्यालयांचे ७० प्राध्यापक उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य प्रशांत पाटील यांनी केले. सूत्रसंचालन दिव्यकुमारी यांनी केले. प्राचार्य संदीप पवार यांनी आभार मानले. (वार्ताहर)