शासनाच्या ३३ कोटोवृक्ष लागवड कार्यक्र म अंतर्गत ब्राह्मण गाव येथे वृक्ष लागवडीस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 07:48 PM2019-07-01T19:48:43+5:302019-07-01T19:50:00+5:30
ब्राम्हण गाव : महाराष्ट्र शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्र माअंतर्गत ब्राम्हणगाव ता. बागलाण येथे २० हेक्टर क्षेत्रावर खड्डे खोदलेले असून येथे २२ हजार रोपांची लागवड केली जाणार आहे. त्यासाठी सोमवारी (दि.१) सरपंच सरला अहिरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी वनपाल व्ही. बी. हिरे, जे. के. शिरसाट, माजी सरपंच अनील खरे, पोलीस पाटील कैलास मालपाणी, लखमापूर वन संरक्षण समितीचे अध्यक्ष काशिनाथ हांडे, वनरक्षक डी. एम. देवकाते, वनमजुर दादाजी बोरसे, चंद्रकांत ढिवरे, प्रभाकर बागुल, तुळसा बागुल आदीे उपस्थित होते.
ब्राम्हणगाव परिसरात सलग तिसऱ्या वर्षी लागवड होत असल्याने येथील वनक्षेत्रात वाढ होऊन परिसर निसर्गरम्य होत असल्याने ग्रामस्थांचा देखिल सहभाग वाढला आहे.