मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या कामाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 10:31 PM2018-10-01T22:31:07+5:302018-10-01T22:31:42+5:30

निफाड : लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू झाली असून, त्याचाच एक भाग म्हणून मतदार याद्या अद्यावत करणे, नवमतदारांची नोंदणी करणे यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.

Start of updation of voter lists | मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या कामाला प्रारंभ

मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या कामाला प्रारंभ

Next
ठळक मुद्देनवमतदारांची नोंदणी : प्रभावी अंमलबजावणीसाठी निफाडला बैठक

निफाड : लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू झाली असून, त्याचाच एक भाग म्हणून मतदार याद्या अद्यावत करणे, नवमतदारांची नोंदणी करणे यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.
त्या निमित्ताने दिंडोरी लोकसभाअंतर्गत निफाड विधानसभा मतदारसंघाच्या मतदार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निफाडचे उपविभागीय अधिकारी महेश
पाटील यांनी त्यांच्या दालनात राजकीय पक्षांचे पदाधिकारी व सर्कल आॅफिसर यांची बैठक घेतली. याप्रसंगी तहसीलदार दीपक पाटील उपस्थित होते. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम दि. १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर या काळात राबविण्यात येत आहे. या अंतर्गत नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतील नावे वगळणे, नाव दुरु स्त करणे, नाव स्थलांतरित करणे यासाठी कार्यवाही केली जाणार असल्याचे प्रांताधिकारी पाटील यांनी सांगितले.
आतापर्यंत चांदोरी, सायखेडा, पिंपळगाव या ठिकाणी असलेल्या महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसमोर मतदार पुनरीक्षण कार्यक्रम घेण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी नगराध्यक्ष एकनाथ तळवाडे भाजपाचे जिल्हा चिटणीस शंकर वाघ, पंढरीनाथ थोरे, तालुकाध्यक्ष संजय वाबळे, विस्तारक संजय गाजरे, शिवसेना तालुकाप्रमुख सुधीर कराड, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र बोरगुडे, दिलीप कापसे, रिपाइंचे भरत खडताळे, आपचे तालुकाध्यक्ष उत्तम निरभवणे, मनसे उपजिल्हाध्यक्ष धर्मेश जाधव, सुरेश देवकर, संतोष पगारे यांच्यासह राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.मतदार नोंदणीस सहकार्य करावेनिफाड मतदारसंघात एकूण २७१ बीएलओ आहेत. त्यांच्या मार्फत हा कार्यक्रम सुरू आहे. ते घरोघरी मतदार नोंदणीसाठी येतील तेव्हा नागरिकांनी त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन पाटील यांनी केले. मतदार यादीमध्ये काही चुका असतील तर राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित बीएलओंना सांगावे व या कार्यक्रमात आपला सहभाग द्यावा, दुबार मतदार नोंदणीची चौकशी करताना सहकार्य करावे, असे आवाहन करताना राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीने एक गठ्ठा मतदार नोंदणी अर्ज देऊ नयेत ते स्वीकारले जाणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Start of updation of voter lists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.