राजापूर येथे वारकरी बालसंस्कार शिबीरास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 12:18 AM2019-05-10T00:18:30+5:302019-05-10T00:19:10+5:30

दिंडोरी : तालुक्यातील राजापूर येथे संत पाटील बाबा ज्ञानदान संस्था आयोजित स्वानंद सुखनिवाशी जोग महाराज पुण्यतिथी वर्षानिमित्ताने नविन पिढी सुसंस्कृत व सक्षम बनवण्यासाठी दिंडोरी तालुक्यातील राजापूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले असून नुकताच सदर शिबिराचा प्रारंभ झाला.

Start of Warcari Child Sanskar Camp at Rajapur | राजापूर येथे वारकरी बालसंस्कार शिबीरास प्रारंभ

राजापूर येथे वारकरी बालसंस्कार शिबीरास प्रारंभ

googlenewsNext
ठळक मुद्देनुकताच सदर शिबिराचा प्रारंभ झाला.

दिंडोरी : तालुक्यातील राजापूर येथे संत पाटील बाबा ज्ञानदान संस्था आयोजित स्वानंद सुखनिवाशी जोग महाराज पुण्यतिथी वर्षानिमित्ताने नविन पिढी सुसंस्कृत व सक्षम बनवण्यासाठी दिंडोरी तालुक्यातील राजापूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले असून नुकताच सदर शिबिराचा प्रारंभ झाला.
२५ मे पर्यंत चालणाऱ्या या शिबीरात चौथी ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी वारकरी संप्रदायातील वाद्यांसह किर्तन, प्रवचन परंपरेचे प्रशिक्षण घेत आहे. विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण घ्यायला आळंदीतील वारकरी संप्रदायाचे शिक्षक सागर महाराज शास्त्री, वाल्मिक महाराज नलावडे, हितेश महाराज वारूडे, शरद महाराज जाधव, शुभम महाराज ढोले, प्रदिप महाराज रोडे, माऊली महाराज उगले हे शिक्षण देत आहे.
शिबिर दोन मे पासून सुरू होऊन त्याची सांगता पंचवीस मे रोजी पंचदिनी किर्तन महोत्सवाने होईल. या महोत्सवात योगेश महाराज धात्रक त्र्यंबकेश्वर, अनिल महाराज महाकले आळंदी, हनुमान महाराज गंगथडे, रमाकांत महाराज खेडगावकर तर सांगतेचे काल्याचे किर्तन भागीरथ महाराज काळे यांचे होईल. असे युवा कीर्तनकार अभिजित महाराज देशमुख राजापूरकर यांनी केले आहे.

Web Title: Start of Warcari Child Sanskar Camp at Rajapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक