पांढुर्लीला टमाटा लिलावास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 11:36 PM2017-10-01T23:36:39+5:302017-10-02T00:08:47+5:30
सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पांढुर्ली उपबाजार आवारात विजयादशमीच्या मुहूर्तावर शनिवारपासून टमाटा लिलावास प्रारंभ करण्यात आला.
सिन्नर : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पांढुर्ली उपबाजार आवारात विजयादशमीच्या मुहूर्तावर शनिवारपासून टमाटा लिलावास प्रारंभ करण्यात आला.
बाजार समितीचे सभापती अरुण वाघ यांच्या हस्ते लिलावाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी उपसभापती सोमनाथ भिसे, पांढुर्लीच्या सरपंच वैशाली भालेराव, सावता माळी नगरचे सरपंच विजय मंडलिक, पंढरीनाथ ढोकणे, विष्णुपंत वाजे, रंगनाथ जाधव, बाळासाहेब दळवी, सयाजी भोर, अंबादास भुजबळ, कचरू ढोकणे, राजू मंडलिक, भरत आरोटे, अरुण हारक, बाळासाहेब बरकले, राहुल बलक, योगेश घोटेकर आदी उपस्थित होते. पहिल्याच दिवशी ४ हजार ५० जाळ्या इतकी टमाट्याची आवक झाली. शेतमाल खरेदीसाठी शौकत बागवान, रईस पटेल, जब्बार शेख, आसिफ बागवान, अनिल हारक, प्रभाकर हारक, शौकत सरदार बागवान, नासिर शेख, संतोष जोशी, शिवाजी तुपे, शंकर तुपे, दिलावर बागवान, निवृत्ती तुपे यांनी लिलाव प्रक्रियेत भाग घेतला. पांढुर्ली उपबाजारातील टमाटा लिलावप्रक्रियेत सहभागी होण्यासाठी शेतकºयांनी दररोज दुपारी २ वाजता शेतमाल घेऊन येण्याचे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी बाजार समितीचे सचिव विजय विखे, उपसचिव आर. एन. जाधव, ए. सी. शिंदे, पी. आर. जाधव, आर. जे. डगळे, व्ही. एस. कोकाटे, ए. बी. भांगरे, व्ही. बी. मोरे, एस. व्ही. वाळुंज आदिंसह बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते.