दुष्काळी गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे कालव्याचे काम विनाशर्त सुरु करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 05:48 PM2019-02-13T17:48:27+5:302019-02-13T17:48:40+5:30
सिन्नर : सिन्नर तालुक्यातील ६ दुष्काळी गावांना वरदान ठरणाºया निळवंडे कालव्यांचे काम विनाशर्त सुरू करा अशी मागणी निळवंडे कालवा कृती समितीच्यावतीने करण्यात आली.
सिन्नर : सिन्नर तालुक्यातील ६ दुष्काळी गावांना वरदान ठरणाºया निळवंडे कालव्यांचे काम विनाशर्त सुरू करा अशी मागणी निळवंडे कालवा कृती समितीच्यावतीने करण्यात आली. कालव्यांना विरोध करणाºया अकोले तालुक्यातील नेत्यांचे पितळ उघडे पाडण्याचा इशारा कृती समितीचे कार्यकर्ते रंगनाथ गव्हाणे यांनी दिला.
सिन्नर तालुक्यातील सायाळे व मलढोण या गावामध्ये जनजागृती सभा नुकतीच घेण्यात आली. शिवाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेसाठी कृती समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे, उपाध्यक्ष संजय गुंजाळ, गंगाधर राहणे, सोमनाथ दरंदले, सुधाकर शिंदे, डॉ. विजय शिंदे, साहेबराव देवगुंडे, सुभाष शिंदे, गंगाधर पवार, किसन पावले, रंगनाथ पावले, सचिन हालवर, शिवाजी हालवर, प्रकाश गेठे, मंडलिक पावले, चांगदेव हालवर आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह शेतकरी उपस्थित हाते.
उत्तर नगर जिल्ह्यातील १८२ व सिन्नर तालुक्यातील ६ दुष्काळी गावांना या कालव्याचा लाभ होणार आहे. मात्र निळवंडे कालवा कृती समितीवर आरोप करण्यात येत आहे. हे आरोप करणाºया अकोलेतील राष्टÑवादीच्या नेत्यांनी भान ठेवावे. कालवा कृती समिती हे राजकीय व्यासपिठ नसूून ती शेतकºयांनी शेतकºयांसाठी चालवलेली चळवळ आहे. या चळवळीत राजकीय नेत्यांना स्थान देण्यात आलेले नाही. राजकीय नेत्यांवर विश्वास ठेवल्यानेच निळवंडेचे घोंगडे आजतागायत भिजत पडले आहे. या प्रकल्पाला ४९ वर्षे पूर्ण होवूनही लाभ क्षेत्रात पाणी पोहचत नाही यातच या नेत्यांचे अपयश लपले आहे. ि