पुणे-इंदूर महामार्गाचे काम सुरू करा, या मागणीसाठी रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:31 AM2021-09-02T04:31:56+5:302021-09-02T04:31:56+5:30
येवला : पुणे-इंदूर महामार्गाचे काम तात्काळ सुरू करा, या मागणीसाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येवला- मनमाडरोड वरील अंकाई येथे ...
येवला : पुणे-इंदूर महामार्गाचे काम तात्काळ सुरू करा, या मागणीसाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येवला- मनमाडरोड वरील अंकाई येथे विसापूर फाट्यानजीक रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
पुणे- इंदूर महामार्ग हा सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे. झालेले काम निकृष्ट दर्जाचे असून सदर महामार्गावर रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. खड्ड्यांमुळे अनेक दुर्घटना झाल्या असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. रात्रीच्या वेळेस रस्तालुटीचे प्रमाण वाढलेले असल्याचे तहसीलदार व संबंधितांना दिलेल्या निवेदनात स्वारिपने म्हटले आहे.
संबंधित अभियंत्यास तात्काळ निलंबित करून त्यांचे वेतनातून झालेल्या खर्चाची भरपाई करून घ्यावी, झालेल्या कामाची सर्वंकष चौकशी करावी आदी मागण्याही सदर निवेदनात करण्यात आल्या आहेत.
आंदोलनात तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे, विजय घोडेराव, डॉ. सुधीर जाधव, बाळासाहेब आहिरे, विनोद त्रिभुवन, मयूर सोनवणे, विधाता आहिरे, बाळा सोनवणे, हमजा मन्सुरी, सुरेश सोनवणे, संतोष आहिरे, आकाश गोतीस, बाळासाहेब गायकवाड, भीमराज गायकवाड, तुषार आहिरे, शरद गायकवाड, आशा आहेर, ॲड. स्मिता झाल्टे, ज्योती पगारे, उषा पगारे, संगीता रणधीर, पार्बताबाई पगारे आदी सहभागी झाले होते.
(०१ येवला १)
010921\01nsk_51_01092021_13.jpg
पुणे-इंदूर महामार्गाचे काम सुरू करा मागणीसाठी रास्तारोको