युवक जोडो अभियानास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 12:39 AM2017-11-08T00:39:34+5:302017-11-08T00:39:54+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक जोडो अभियानास नाशिक जिल्ह्यात सुरुवात झाली असून, कळवण शहर व तालुक्यात राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या शाखा उद्घाटनप्रसंगी रायुकॉँचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांना राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या गटबाजीचे उघड दर्शन घडून या गटबाजीच्या दर्शनातून झालेले स्वागत तालुक्यात सध्या चर्चेचा विषय झाला आहे.

Start the Youth Pairs campaign | युवक जोडो अभियानास सुरुवात

युवक जोडो अभियानास सुरुवात

Next

कळवण : राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक जोडो अभियानास नाशिक जिल्ह्यात सुरुवात झाली असून, कळवण शहर व तालुक्यात राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या शाखा उद्घाटनप्रसंगी रायुकॉँचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांना राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या गटबाजीचे उघड दर्शन घडून या गटबाजीच्या दर्शनातून झालेले स्वागत तालुक्यात सध्या चर्चेचा विषय झाला आहे.
राज्यभरात पाच हजार युवकांच्या शाखा उघडण्याबरोबरच पुढील तीन महिन्यात पक्षाला दोन लाख नवीन युवक जोडण्याचा संकल्प असून, सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या कामांचे निर्णय घेण्यास सरकारला भाग पाडू, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी कळवण येथे केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांबरोबर युवक जोडण्याचा संकल्प करणारे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील हे मात्र कळवण तालुक्यात स्वागताऐवजी गटबाजीच्या आलेल्या अनुभवातून चांगलेच नाराज झाले. नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या वतीने युवक जोडो अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात कळवण शहर व तालुक्यात शाखा उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन रायुकॉँ प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते. केंद्र व राज्यात सत्तारूढ भाजपा- शिवसेना युती सरकार सत्तेत आल्यापासून गेल्या तीन वर्षांत शेतकºयांच्या प्रश्नांवर प्रचंड मोठी आंदोलने होऊनदेखील युती सरकारने अजूनही याबाबत योग्य ती पावले उचललेली नाहीत.
जिल्ह्यातदेखील १ जानेवारी २०१७ पासून आजपर्यंत ९६ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकार शेतकºयांच्या प्रश्नावर उदासीन असल्याची टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार यांनी यावेळी बोलताना केली.
युवक जोडो अभियानाच्या पहिल्या टप्प्याचा समारोप आज होत असून, दुसरा टप्पा लवकरच सुरू करणार आहे. यात ५०० शाखा उघडण्याचा मानस असल्याचे सांगून युवक संघटना ही राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची फायटिंग ब्रिगेड असल्याने युवक कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून आगामी काळात पक्षाला मोठ्या प्रमाणावर युवक जोडून रस्त्यावर उतरून आक्रमकपणे आंदोलने करावीत, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी केले आहे. यावेळी कळवण शहरात संभाजीनगर, गावठाण, एसटी बसस्थानक, मेनरोड, निवाणे, बालापूर, गोपाळखडी, हिंगवे, वाडी, एकलहरे येथील राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या शाखांचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, जिल्हा परिषद सदस्य डॉ. भारती पवार, कळवण नगरपंचायतचे गटनेते कौतिक पगार, कळवण बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, शहराध्यक्ष जितेंद्र पगार आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Start the Youth Pairs campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.