फुटलेल्या जलवाहिनी दुरूस्तीच्या कामाला मनपाकडून सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 01:29 AM2018-12-08T01:29:02+5:302018-12-08T01:29:35+5:30
मेनगेट येथील मनपाच्या जलशुद्धीकरण केंद्रात जाणाऱ्या जलवाहिनीला नवले कॉलनी रस्त्याच्या खाली गळती लागल्याने मुद्रणालयाच्या पडिक जागेत डबके साचून दूषित पाणीपुरवठा होत होता. यामुळे रहिवाशांना त्वचेच्या आजाराची लागण होत असल्याचे सचित्र वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच मनपा प्रशासनाकडून लागलीच नवले कॉलनी रस्ता फोडण्यास सुरुवात करून कामास सुरुवात करण्यात आली.
नाशिकरोड : मेनगेट येथील मनपाच्या जलशुद्धीकरण केंद्रात जाणाऱ्या जलवाहिनीला नवले कॉलनी रस्त्याच्या खाली गळती लागल्याने मुद्रणालयाच्या पडिक जागेत डबके साचून दूषित पाणीपुरवठा होत होता. यामुळे रहिवाशांना त्वचेच्या आजाराची लागण होत असल्याचे सचित्र वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच मनपा प्रशासनाकडून लागलीच नवले कॉलनी रस्ता फोडण्यास सुरुवात करून कामास सुरुवात करण्यात आली.
मेनगेट येथील मनपाच्या जलशुद्धीकरण केंद्रात जाणारी जलवाहिनी गेल्या आठ महिन्यांपासून नवले कॉलनी रस्त्याखाली गळती लागल्याने दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. जलवाहिनीतून वाया जाणारे पाणी रस्त्या शेजारील मुद्रणालयाच्या पडिक मोकळ्या जागेत डबक्या स्वरूपात साचले आहे. पडिक जागेवर साचलेले पाणी जमिनीत झिरपत नसल्यामुळे ते पाणी दूषित व दुर्गंधीयुक्त झाले आहे. यामुळे डासांची उत्पती वाढत आहे. डबक्यातील दूषित पाणी नवले कॉलनी व आजूबाजूच्या रहिवाशांच्या बोरिंग, विहिरीत उतरल्याने रहिवाशांना त्वचेचे आजाराची लागण आहेत. यामुळे काही रहिवासी घर सोडून दुसरीकडे राहण्यास निघून गेले आहे. याबाबतचे सविस्तर सचित्र वृत्त शुक्रवार (दि.७) ‘लोकमत’च्या अंकात प्रसिद्ध झाले. या वृत्ताची दखल घेऊन मनपा प्रशासनाने शुक्रवारी सकाळपासून नवले कॉलनी रस्त्यावरील जलवाहिनीचे लिकेज शोधून दुरुस्ती करण्यासाठी मजुराच्या मदतीने सीमेंट कॉँक्रीटचा रस्ता फोडण्यास सुरुवात केली. दुपारपासून ‘ब्रेकर’ मशीनच्या साह्याने सीमेंट कॉँक्रीटचा रस्ता फोडण्यात येत होता. मात्र मनपाने हाती घेतलेले काम चार-पाच मजुरांच्या मदतीने अत्यंत धिम्या गतीने सुरू असल्याने अजून जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी किती दिवस लागतील हे मनपा प्रशासनालाच माहीत नाही. परंतु ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने रहिवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.