दूषित पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी हटविण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 12:23 AM2019-06-23T00:23:21+5:302019-06-23T00:23:38+5:30

इंदिरानगर : प्रभाग क्रमांक ३१ मधील मुरलीधर नगर परिसरात भूमिगत गटार मिश्रित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण ...

 Starting to remove the contaminated water supply system | दूषित पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी हटविण्यास सुरुवात

दूषित पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी हटविण्यास सुरुवात

Next

इंदिरानगर : प्रभाग क्रमांक ३१ मधील मुरलीधर नगर परिसरात भूमिगत गटार मिश्रित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला होता त्याची दखल घेत प्रभागाचे नगरसेवक सुदाम डेमसे व नगरसेवक संगीता जाधव यांनी तातडीने पाणीपुरवठ्याची पाइपलाइन भूमिगत गटारीपासून वेगळी करण्याची सूचना केल्याने महापालिकेने कामास सुरुवात केली आहे.
मुरलीधरनगरमधील अथर्व कॉलनी परिसरातील ४० रो-हाउसमध्ये गेल्या चार दिवसांपासून भूमिगत गटारीचे मिश्रित दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठ्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पाणीपुरवठ्यामुळे लहान बालकांना उलट्या व जुलाब सुरू झाले. दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे पिण्याचे पाणी सुद्धा भरणे अवघड झाले होते. त्यामुळे परिसरातील महिलांनी नगरसेवक संगीता जाधव व सुदाम डेमसे यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत परिसरात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. शुक्रवारी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कामास सुरुवात केली.

Web Title:  Starting to remove the contaminated water supply system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.