ऑस्ट्रेलियन यंत्राद्वारे खड्डे बुजविण्याच्या कामाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 01:35 PM2019-12-18T13:35:04+5:302019-12-18T13:35:44+5:30
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य ते अस्वली हा राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभगातर्फे अत्याधुनिक ऑस्ट्रेलियन यंञाद्वारे सुरू करण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य ते अस्वली हा राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभगातर्फे अत्याधुनिक ऑस्ट्रेलियन यंञाद्वारे सुरू करण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
नांदूरवैद्य ते अस्वली हा राष्ट्रीय महामार्गाला जोडणाºया रस्त्यावर यावर्षी झालेल्या जोरदार पावसाने मोठमोठे खड्डे पडल्यामुळे दुरावस्था झाली होती. सदर रस्त्याची लवकरात लवकर दुरूस्ती करण्यात यावी या नागरिकांच्या मागणीचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली. अस्वली ते नांदूरवैद्य या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामास प्रारंभ करण्यात आल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सदर रस्त्याची आॅस्ट्रेलियन पद्धतीने यंञाच्या साहाय्याने दुरूस्ती करण्यात येत असल्याने प्रथमत: रस्त्यावर असलेल्या खड्ड्याची स्वच्छता करण्यात येऊन या खड्ड्यामध्ये यंञाद्वारे खड्डा पुर्णपणे बुजविन्यात येतो. यामुळे रस्त्याचे कायमस्वरूपी डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. या रस्त्याच्या दुरु स्तीची मागणी मनसेचे विधानसभा अध्यक्ष गणेश मुसळे तसेच परिसरातील नागरिकांनी केली असून तसेच प्रत्यक्ष सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले होते. या रस्त्याला अनेक वर्षांपासून पथदीप नसल्यामुळे राञी अपराञी या रस्त्यावर हिंस्ञश्वापदांचा वावर असल्याने तसेच गोंदे येथील औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणावर परिसरातुन कामगार राञीच्या वेळी कामाला जात येत असल्यामुळे या ठिकाणी पथदिपांची सोय करण्यात यावी अशी आग्रही मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
-----------------
अस्वली ते नांदूरवैद्य या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले असून या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे.सदर रस्त्याला अंधाराचे साम्राज्य असल्याने या ठिकाणी पथदिपांची सोय करण्यात यावी. तसेच या रस्त्याच्या दुरु स्तीसाठी वाढीव निधीसाठी पाठपुरावा करणार असून कायमस्वरूपी डांबरीकरण करण्याची गरज आहे. - गणेश मुसळे, ग्रामस्थ, नांदूरवैद्य