बहारदार सादरीकरणाने कथ्थक उत्सवाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 01:50 AM2019-11-02T01:50:06+5:302019-11-02T01:50:23+5:30
यशोदा आणि कृष्णाच्या संवादातून उलगडत जाणारे सकाळचे वर्णन अन् त्यावर साभिनय रंगलेल्या नृत्याविष्कारानंतर पावसाची तीन रूपे दाखविणारा कथ्थकचा अनोखा नजराणा सादर करीत तीन दिवसीय कथ्थक उत्सवाला शुक्रवारी प्रारंभ झाला.
नाशिक : यशोदा आणि कृष्णाच्या संवादातून उलगडत जाणारे सकाळचे वर्णन अन् त्यावर साभिनय रंगलेल्या नृत्याविष्कारानंतर पावसाची तीन रूपे दाखविणारा कथ्थकचा अनोखा नजराणा सादर करीत तीन दिवसीय कथ्थक उत्सवाला शुक्रवारी प्रारंभ झाला.
नवी दिल्लीचे कथ्थक कला केंद्र आणि नाशिकच्या कीर्ती कलामंदिरच्या वतीने नाशिकच्या प. सा. नाट्यगृहात शुक्रवारपासून तीनदिवसीय कथ्थक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रारंभी भगवान नटराजाच्या मूर्तीचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर नृत्यांगना कमलिनी अस्थाना, रेखा नाडगौडा, किशोर अहिरे, शोभना दातार आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी कीर्ती कलामंदिरच्या आदिती नाडगौडा-पानसे आणि कोलकाताच्या सायानी चावडा यांनी ‘दी जे दरस मोहे’ ही नऊ मात्रेच्या तालात गणेशवंदना सादर केल्यानंतर पं. वि. दि. पलुस्कर यांच्या रचनेवर आधारित बंदीश सादर केली. यावेळी त्यांच्यासह श्रिया गुणे- अंडे, मधुश्री वैद्य, दुर्वाक्षी पाटील, शुभलक्ष्मी बालाजीवाले, कृष्णा देशमुख, तन्वी मोरे, दीक्षा दत्ता, मानसी पवार यांनी सहभाग नोंदविला.
दिल्लीतील कथ्थक केंद्राच्या नर्तकांनी ‘लक्ष्य’ या संकल्पनेवर आधारित नृत्य सादर केले. जयकिशन महाराज यांचे शिष्य विश्वदीप शर्मा, जया भट यांनी कोणत्याही तालात सम गाठणे हे लक्ष्य असले पाहिजे.