विज्ञान प्रदर्शनास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 11:14 PM2019-12-23T23:14:00+5:302019-12-23T23:14:56+5:30

पेठ : पंचायत समिती शिक्षण विभाग व पेठ तालुका विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय आश्रमशाळा इनामबारी येथे ...

Starts science show | विज्ञान प्रदर्शनास प्रारंभ

इनामबारी येथे पेठ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मांडलेल्या प्रतिकृतींची पाहणी करताना सभापती पुष्पा गवळी, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, सरोज जगताप, नंदू गवळी, वसंत खैरनार, धनंजय चव्हाण आदी.

googlenewsNext
ठळक मुद्देपेठ : आदिवासी भागातील विद्यार्थ्यांकडून विविध उपकरणे

पेठ : पंचायत समिती शिक्षण विभाग व पेठ तालुका विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय आश्रमशाळा इनामबारी येथे ४५ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात आला.
पंचायत समितीच्या सभापती पुष्पा गवळी यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. व्ही.एस. खैरनार यांनी स्वागत केले. गटशिक्षण अधिकारी सरोज जगताप यांनी प्रास्तविकेतून विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी विज्ञान प्रदर्शन भरवण्यात येत असल्याचे सांगितले. गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांनी विज्ञानातून शैक्षणिक विकास या विषयावर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी सभापती पुष्पा गवळी, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, नंदू गवळी, गटशिक्षण अधिकारी सरोज जगताप, उपअभियंता अनिल भडांगे, विषप्रमुख वसंत खैरनार, विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष धनंजय चव्हाण, विस्तार अधिकारी प्रशांत जाधव, सुनीता जाधव, भारती कळंबे, मंगला गवळी, विज्ञान अध्यापक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र सावंत, अनिल देवरे, सरपंच संजय भोये, आयोजक मुख्याध्यापक उत्तम चव्हाण, विठ्ठल गवळी, गणेश गवळी, मनोहर गवळी, परीक्षक ए.आर. बोरसे, एस.एम. मेढे, एस.डी. बोरसे, के.डी. सोनवणे, ए.ए. श्रीरामे,यांचे सह पेठ तालुक्यातील विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, बीआरसी विषयतज्ज्ञ, प्राथमिक, माध्यमिक, शासकीय आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, विज्ञानशिक्षक, विद्यार्थी, विज्ञानप्रेमी ग्रामस्थ, शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. रमेश वाघ यांनी सूत्रसंचालन केले. उत्तम चव्हाण यांनी आभार मानले.

Web Title: Starts science show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.