अत्याधुनिक हवामान केंद्र आता शेतकऱ्यांच्या आवाक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:15 AM2021-05-08T04:15:40+5:302021-05-08T04:15:40+5:30

माती, पाणी, पीक व्यवस्थापन व पीक विमा यांच्या अनुषंगाने हवामानाच्या विविध निकषांचा डाटा प्लॉटनिहाय उपलब्ध होऊन शेती अधिक काटेकोर, ...

State-of-the-art meteorological stations are now within the reach of farmers | अत्याधुनिक हवामान केंद्र आता शेतकऱ्यांच्या आवाक्यात

अत्याधुनिक हवामान केंद्र आता शेतकऱ्यांच्या आवाक्यात

googlenewsNext

माती, पाणी, पीक व्यवस्थापन व पीक विमा यांच्या अनुषंगाने हवामानाच्या विविध निकषांचा डाटा प्लॉटनिहाय उपलब्ध होऊन शेती अधिक काटेकोर, अचूक करण्यास त्यामुळे मदत मिळणार आहे.

अत्याधुनिक संगणकीय, उपग्रह व डिजिटल प्रणाली या तंत्रज्ञानाचा वापर करून ‘प्रिसिजन फार्मिंग’ ही त्याची संकल्पना होती.

स्केलर स्टेशन

· द्राक्ष किंवा कोणत्याही शेतीत उत्पादनखर्च पर्यायाने अन्नद्रव्ये व कीडनाशकांवरील खर्च कमी करणे गरजेचे असते. त्यादृष्टीने पीकवाढीच्या प्रत्येक अवस्थेत सर्वेक्षण (मॉनिटरिंग) व सिंचन नियंत्रण अत्यंत महत्त्वाचे असते. या स्टेशनमध्ये वापरलेले सेन्सर्स माती व कॅनोपी यावर देखरेख करतात.

· विविध प्लॉटमध्ये व्यवस्थापन सुरू असते. त्यामुळे प्रत्येक प्लॉटमध्ये स्केलर स्टेशन उभारून कॅनोपी व्यवस्थापन चांगल्या प्रकारे साधता येते.

ट्रेसर स्टेशन हे स्केलर स्टेशनच्या पुढील व्हर्जन आहे. स्केलर स्टेशनमधील सर्व सेन्सर्स व सुविधांचा यात समावेश आहे. ‘वॉटर बॅलन्स इक्वेशन’ काढण्यासाठी आपल्या वैयक्तिक शेतात होणाऱ्या पावसाची माहिती असणे गरजेचे आहे. रेनगेज आपल्या स्वतःच्या शेतात उभारलेले असल्याने प्रत्यक्ष त्या ठिकाणी झालेला पाऊस समजतो. स्केलर’ व ‘ट्रेसर’ या दोन्हींच्या पुढील व्हर्जन म्हणजे मास्टर स्टेशन. प्रिसिजन फार्मिंग’साठी सर्व सुविधांनी युक्त अद्ययावत. आपल्या कॅनोपीतील व स्थानिक भागातील आर्द्रता व तापमान यांच्यातील फरक समजून घेता येतो. गावस्तरावर हवामानाच्या नोंदी संकलित करण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो.

· शेतकरी समूहाद्वारे एकत्र येऊन सामाईक स्तरावर त्याचा वापर करू शकतात.

Web Title: State-of-the-art meteorological stations are now within the reach of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.