नॅनो युरियाचे राज्यात वितरण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:11 AM2021-07-10T04:11:47+5:302021-07-10T04:11:47+5:30

इफको नॅनो युरियाचा राज्यात वितरणाचा शुभारंभ दूरदृष्य प्रणालीव्दारे शुक्रवारी (दि.९) राज्याचे कृषी मंत्री भुसे यांच्या हस्ते ...

State distribution of nano urea continues | नॅनो युरियाचे राज्यात वितरण सुरू

नॅनो युरियाचे राज्यात वितरण सुरू

Next

इफको नॅनो युरियाचा राज्यात वितरणाचा शुभारंभ दूरदृष्य प्रणालीव्दारे शुक्रवारी (दि.९) राज्याचे कृषी मंत्री भुसे यांच्या हस्ते झाला. यावेळी भुसे म्हणाले, नॅनो युरिया मध्ये नत्राच्या कणाचा आकार हा २० ते ५० नॅनोमीटर इतका असतो. नॅनो युरियाचे पृष्ठभागीय क्षेत्रफळ हे बारीक युरिया पेक्षा १० हजार पटीने जास्त असते. त्यामुळे त्याची कार्यक्षमता जास्त असते. नॅनो युरिया मध्ये नत्राचे प्रमाण हे वजनाच्या ४ टक्के असते. नॅनो युरिया २ ते ४ मि.ली. एक लीटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी केली असता नॅनो युरियातील नत्राचे शोषण पानावरील पर्णरंध्रेच्याव्दारे पिकाच्या पेशीमध्ये होते. शोषण केलेला नत्र पेशीतील रिक्तिकामध्ये साठवला जातो व पिकाच्या गरजेनुसार पिकाला पुरवला जातो. यामुळे नॅनो युरियाची कार्यक्षमता ८६ टक्केपर्यंत जात असल्यामुळे बळीराजाला यामुळे नक्कीच दिलासा मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

इन्फो

युरियाची सबसिडी वाचेल

नॅनो युरियाच्या वापरामुळे पिकांच्या उत्पादकतेमध्ये वाढ होते, खर्चात बचत होते आणि पर्यायाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होते. पिकांची पौष्टिकता आणि गुणवत्ता सुधारते, नॅनो युरियाच्या वापरामुळे हवा, पाणी आणि जमीन यांची हानी थांबते. नॅनो युरिया पिकांच्या पानावर फवारत असल्यामुळे जमिनीमध्ये ओलावा नसताना सुध्दा पिकाला नत्राचा पुरवठा करता येतो. नॅनो युरियामुळे जमीन पाणी हवामान व प्राणी यांची होणारी हानी टळेल, याबरोबर युरियासाठी द्यावी लागणारी सबसिडी निश्चितपणे वाचेल, असा विश्वासही भुसे यांनी यावेळी व्यक्त केला.

फोटो- ०९ दादा भुसे

090721\09nsk_30_09072021_13.jpg

फोटो- ०९ दादा भुसे 

Web Title: State distribution of nano urea continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.