जातीय दंगलींना राज्य सरकारच कारणीभूत : अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 03:51 PM2018-05-14T15:51:14+5:302018-05-14T15:51:14+5:30

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेस आघाडी व समविचारी पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदारांच्या मेळाव्यात ते बोलत होते. चार वर्षापुर्वी नरेंद्र मोदी व साडेतीन वर्षापुर्वी देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आले हे सरकारे २०२४ पर्यंत सत्तेवर राहील असे दावे केले जात

State government causes caste riots: Ajit Pawar | जातीय दंगलींना राज्य सरकारच कारणीभूत : अजित पवार

जातीय दंगलींना राज्य सरकारच कारणीभूत : अजित पवार

Next
ठळक मुद्देजातीय दंगलींना राज्य सरकारच कारणीभूतविधान परिषदेसाठी आघाडीचा मेळावा

नाशिक : भीमा-कोरेगाव असो वा औरंगाबादची दंगल असो, ज्या ज्यावेळी निवडणुका जवळ आल्या की दोन समाजात तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजून घेतली जात असून, या सर्व घटनांमध्ये राज्य सरकारचा हस्तक्षेप असल्यामुळे पोलीस देखील हतबल होत असल्याची टिका राष्टÑवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेस आघाडी व समविचारी पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदारांच्या मेळाव्यात ते बोलत होते. चार वर्षापुर्वी नरेंद्र मोदी व साडेतीन वर्षापुर्वी देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आले हे सरकारे २०२४ पर्यंत सत्तेवर राहील असे दावे केले जात होते, प्रत्यक्षात हे सरकार नको असे म्हणण्याची वेळ देशातील जनतेवर आली असून, समाजातील प्रत्येक घटकाची सरकारने फसवणूक केल्याची भावना मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्यामुळे आता हे सरकार घालविण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, जीएसटीमुळे व्यापाºयांचे कंबरडे मोडले, महिलांवर अत्याचार होत आहे. बेरोजगारांना पकोडे तळण्याचा सल्ला दिला जात आहे. पोलीस भरतीत भ्रष्टाचार होत आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत, तर हिमांशू रॉय सारखे वरिष्ठ पोलीस अधिकारी आत्महत्या करू लागले आहेत. नगर जिल्ह्यात दिवसा ढवळ्या खून खराबा होत असून, नागपुरात सात दिवसात १२ जणांची हत्या करण्यात आली आहे. आपल्या राजकीय जीवनात ३२ वर्षात पहिल्यांदा अशी परिस्थिती आपण पाहिल्याचेही पवार म्हणाले.
राज्यात १४०० कोटी तूर सडत पडली असून नवीन तूर कोठे साठवायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. पेट्रोल, डिझेलचे दर आकाशाला भिडले, खतांच्या किंमतीत भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. देशाचा पंतप्रधान निवडणूक प्रचारात खालच्या पातळीवर जावून भाषणे करीत आहे. निवडणुका जिंकण्यासाठी सर्वत्र भगवेकरण करण्याचा प्रयत्न भाजपा करू लागली आहे. विरोधकांना खोट्या नाट्या गुन्ह्यात अडकविण्याचे मोक्का, तडीपारी करण्याचे उद्योग केले जात असून, भुजबळ सारख्या नेत्यांना विनाकारण २६ महिने तुरूंगात अडकविण्यात आले आहे. भाजपाची वाटचाल सत्तेतून पैसा व पैशांतून दहशत व पुन्हा दहशतीच्या माध्यमातून सत्ता अशा प्रकारे होत असून, असे सरकार आजवर पाहिले नसल्याची टिकाही अजित पवार यांनी केली.
 

Web Title: State government causes caste riots: Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.